IAS Officer in India : या पाच 'आयएएस' अधिकाऱ्यांनी नागरी सेवा सोडून केला ; स्वत:चा व्यवसाय सुरू

Rashmi Mane

विवेक कुलकर्णी

1970 च्या बॅचचे ते 'आयएएस' अधिकारी आहेत. तब्बल 22 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी 'ब्रिकवर्क इंडिया' ही नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग फर्म सुरु केली. ही फर्म जागतिक कंपन्यांचे वर्चुअलर असिस्टेंस म्हणून काम करते.

Vivek Kulkarnai | Sarkarnama

रोमन सैनी

2014 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात IAS परीक्षा पास केली. त्यावेळी ते सर्वात तरुण 'आयएएस' अधिकारी होते. मात्र, काही वर्षांनंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि 'अनाकॅडमी' हे अॅप सुरु केले.

Roman Saini | Sarkarnama

प्रवेश शर्मा-

1982 मध्ये IAS अधिकारी बनले आणि तीन दशकांहून अधिक काळ सरकारी कार्यालयात काम केल्यानंतर, त्यांनी 2016 मध्ये स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'सब्जीवाला' नावाची फळे आणि भाज्याचा एक स्टार-अप सुरु केला.

Pravesh Shrama | Sarkarnama

राजन सिंह-

नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राजन सिंग यांनी तिरुअनंतपुरमचे 'पोलिस आयुक्तपद' भूषवले. आठ वर्ष सेवा केल्यानंतर, त्यांनी 'ConceptOwl' या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मची स्थापना केली.

Rajan Singh | Sarkarnama

सय्यद सबाहत अजीम

सय्यद सबाहत अजीम हे 2000 च्या बॅचचे 'आयएएस' अधिकारी होते. काही वर्षे आयएएस अधिकारी म्हणून काम केल्यानंतर, 2010 मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि 'ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम्स' नावाची कंपनी सुरू केली.

Dr. Syed Sabahat Azim | Sarkarnama

Next: इंजीनियरिंग झालेल्या सरपंचांची सोशल मीडियावर हवा; जगात घडणाऱ्या गोष्टी गावपातळीवर राबवणार...