Political Journey Sanjay Shirsat: सुषमा अंधारेंवरील टीकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या संजय शिरसाटांचा 'असा' आहे राजकीय प्रवास!

सरकारनामा ब्यूरो

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहे. राजकारणात येण्याआधी ते रिक्षा व्यावसायिक होते.

Sanjay Shirsat | SARKARNAMA

1985 साली त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.

Sanjay Shirsat | SARKARNAMA

2000 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 साली पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या 2014, 2019मध्येही शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली.

Sanjay Shirsat | SARKARNAMA

मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिरसाट यांनीही बंडखोरी केली होती.

Sanjay Shirsat | SARKARNAMA

शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं. हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच चर्चेचा विषय ठरलं होतं.

Sanjay Shirsat | SARKARNAMA

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदेंच्या मंत्रिमंडळात शिरसाट यांचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारच रखडल्यानं ते मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहे.

Sanjay Shirsat | SARKARNAMA

एकीकडे अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांना मंत्रिपद मिळालं तर दुसरीकडे शिरसाटांच्या पदरी प्रतीक्षाच आहे. तसेच अनेकदा ते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आले आहेत.

Sanjay Shirsat | SARKARNAMA

सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत…अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अंधारेंवर टीका केली आहे. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे.

Sanjay Shirsat | SARKARNAMA

आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची महिला आयोगात धाव घेतली असून शिरसाटांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Sanjay Shirsat | SARKARNAMA

Next : राहुल गांधींची खासदारकी रद्द; चर्चा मात्र लक्षद्वीपचे खासदार फैजल यांचीच ?