Mohammed Faizal : राहुल गांधींची खासदारकी रद्द; चर्चा मात्र लक्षद्वीपचे खासदार फैजल यांचीच ?

सरकारनामा ब्युरो

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर लक्षद्वीपचे खासदार पीपी मोहम्मद फैजल यांचीच चर्चा झाली.

Mohammed Faizal | Sarkarnama

गांधी आणि फैजल यांना शिक्षा झाल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची खासदारकी रद्द झाली आहे.

Mohammed Faizal | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राबाहेरील फैजल एकमेव खासदार आहेत.

Mohammed Faizal | Sarkarnama

फैजल यांना २००९च्या लोकसभेवेळी काँग्रेस नेत्याच्या खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Mohammed Faizal | Sarkarnama

सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध फैजल यांनी केरळ उच्च न्यायालयात अपील केले. ते प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने लक्षद्वीपच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली.

Mohammed Faizal | Sarkarnama

पोटनिवडणुकीपूर्वी केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांना सुनावलेली शिक्षा आणि १० वर्षांची शिक्षा स्थगित केली. त्यानंतर निवडणूक आयोगानेही पोटनिवडणूक थांबवण्याचा निर्णय घेतला.

Mohammed Faizal | Sarkarnama

केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यास नकार देत याचिकेवर २८ मार्च रोजी सुनावणी ठेवली.

Mohammed Faizal | Sarkarnama

नव्या याचिकेत फैजल यांनी लोकसभा सचिवालयाने १३ जानेवारीची अपात्रता अधिसूचना मागे न घेण्याला आव्हान दिले आहे.

Mohammed Faizal | Sarkarnama

NEXT : राजकारणी पण गोल्फचे शौकिन : बसवराज बोम्मई