Narendra Modi Car's : पंतप्रधान मोदींकडे कोणकोणत्या कार आहेत? पाहा कलेक्शन!

सरकारमाना ब्यूरो

नरेंद्र मोदी नेहमी वेगवेगळ्या गाड्यांमधून प्रवास करतांना दिसले. मोदींच्या ताफ्यामध्ये आलिशान गाड्यांचा समावेश आहे. PM मोदींना काही सर्वोत्तम कार कोणत्या ते पाहूयात.

PM Narendra Modi | Sarkarnama

Mahindra Scorpio : महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही ही नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील एक महत्त्वाची गाडी आहे, कारण मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंत त्यांनी कार मधून प्रवास केला होता.

Mahindra Scorpio | Sarkarnama

Tata safari : टाटा सफारी ही नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील अजून एक कार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ही गाडी सर्वाधिक वापरल्या गेलेल्या कारपैकी एक होती.

Toyota Fortuner | Sarkarnama

Toyota Land Cruiser : पंतप्रधानांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय सक्षम अशी टोयोटा लँड क्रूझर एसयूव्ही मोदींच्या ताफ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मोदींची सुरक्षितता लक्षात घेऊन या गाडीमध्ये काही बदल देखील करण्यात आले आहे. याशिवाय, ही कार पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे.

Toyota Land Cruiser | Sarkarnama

BMW 7-Series 760 Li High-Security Edition : जगातील सर्वात सुरक्षित कार म्हणून बघितली जाणारी बीएमडब्लू. बुलेट-प्रूफ कार प्रवाशांना बॉम्बपासून वाचवू शकते आणि 20-इंच टायर पॅक करू शकते, ही कार बुलेटप्रूफ देखील आहे. यात सेल्फ सीलिंग पेट्रोल टाकी आणि त्यासोबत मोदींच्या कारला ऑक्सिजन टाकी देखील बसवण्यात आली आहे.

BMW 7-Series 760 Li High-Security Edition | Sarkarnama

Range Rover HSE : रेंज रोव्हर एचएसई या गाडीने BMW ची जागा घेतली आहे. या गाडीमुळे शहरी किंवा ग्रामीण भागातील कोणत्याही रत्यावर अगदी सहजपणे प्रवास करू शकतात.

Range Rover HSE | Sarkarnama

Mercedes-Maybach S650 Guard : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातली ही कार आर्मर्ड लक्झरी सलून आहे. या कारची किंमत सुमारे 12 कोटी आहे. या गाडीची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की अगदी मोठ्या हल्यालाही तोंड देवून प्रवासांना सुरक्षित ठेऊ शकते.

Mercedes-Maybach S650 Guard | Sarkarnama