J. P. Nadda : सामान्य कार्यकर्ता ते भाजपाध्यक्ष ; कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

मूळचे हिमाचल प्रदेशचे पण बिहारमध्ये जन्मलेले जे.पी. नड्डा यांचा भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात मोठा वाटा आहे.

J. P. Nadda | Sarkarnama

जे. पी. नड्डा यांचा जन्म पाटणामध्ये २ डिसेंबर १९६० ला झाला. पाटणा येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातून नड्डा यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हिमाचल प्रदेशातून त्यांनी एलएलबीची डिग्री घेतली.

J. P. Nadda | Sarkarnama

विद्यार्थीदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत नड्डा यांनी सहभाग नोंदवला. हिमाचल प्रदेशात शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते.

J. P. Nadda | Sarkarnama

१९८६ पासून नड्डा राजकारणामध्ये सक्रिय आहेत. सुरुवातीला अभाविपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

J. P. Nadda | Sarkarnama

वयाच्या ३३ व्या वर्षी नड्डा यांनी हिमाचलमधून आमदारकीची निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले.

J. P. Nadda | Sarkarnama

राज्यातील या यशस्वी राजकीय प्रवासानंतर जे. पी. नड्डा यांचा प्रवेश भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात झाला. २०१२ मध्ये त्यांनी राज्यसभा लढवली. त्यानंतर ते अमित शाह यांचे विश्वासू सहकारी झाले.

J. P. Nadda | Sarkarnama

जे. पी नड्डा यांना अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जाते.

J. P. Nadda | Sarkarnama

जे.पी. नड्डा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत.

J. P. Nadda | Sarkarnama

निवडणुकीमध्ये भाजपाला मिळालेल्या विजयामध्ये नड्डा यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे जे. पी. नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

J. P. Nadda | Sarkarnama

२०२४ च्या लोकसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याची, घोषणा भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

J. P. Nadda | Sarkarnama