Narhari Zirwal : महाराष्ट्रातच नाही तर जपानमध्येही नरहरी झिरवळ यांची क्रेझ; पाहा खास फोटो!

Ganesh Thombare

जपानमध्येही क्रेझ

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे कायमच चर्चेत असतात. आता जपानमध्येही त्यांची क्रेझ दिसून आली आहे.

आमदारांचा जपान दौरा

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा आयोजित अभ्यास दौर्‍यासाठी काही आमदार जपानला गेले होते. यामध्ये नरहरी झिरवळ यांचाही समावेश होता.

मराठी वेशभूषेत

जपान दौर्‍यादरम्यान एअरपोर्टवर झिरवळ सपत्निक आपल्या अस्सल पारंपारिक मराठी वेशभूषेमध्ये पाहायला मिळाले. त्यांच्या या फोटोची चांगलीच चर्चा झाली.

साधेपणाचं कौतुक

जपानला अभ्यास दौर्‍यावर गेल्यानंतर देखील अस्सल मराठमोळ्या वेशात मिस्टर आणि मिसेस झिरवळ पाहायला मिळाले. त्यांच्या या साधेपणाचं कौतुक होत आहे.

आदिवासी बहुल भागाचे प्रतिनिधित्व

नरहरी झिरवळ हे नाशिकमधील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात.

तिसऱ्यांदा आमदार

2001 मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून आले. तर 2004, 2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर तिसऱ्यांदा आमदार झाले.

विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत

झिरवळ सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत.

पवारांचे निकटवर्तीय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून नरहरी झिरवळ यांना ओळखलं जातं.

Next : सरकारी बंगला सोडताना राहुल गांधी भावूक; स्वत:च्या हाताने लावलं कुलूप पहा फोटो