Rahul Gandhi : सरकारी बंगला सोडताना राहुल गांधी भावूक; स्वत:च्या हाताने लावलं कुलूप पहा फोटो

अनुराधा धावडे

बंगला पूर्णपणे रिकामा केला

नोटीस मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी (२२ एप्रिल) 12, तुघलक लेन येथील सरकारी बंगला रिकामा केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधींनी स्वतः कुलूप लावून अधिकाऱ्यांना चावी दिली

राहुल गांधींनी स्वत: बंगल्याचा दरवाजा लावून घेतला आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकसभा सचिवालयाच्या अधिकाऱ्यांना चाव्या दिल्या.

Rahul Gandhi | Sarkarnama

ही सत्य बोलण्याची किंमत आहे

भारतातील जनतेने मला 19 वर्षे हे घर दिले, मला त्यांचे आभार मानायचे आहेत. सत्य बोलण्याची ही किंमत आहे. सत्य बोलण्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, अशी भावना यावेळी राहुल गांधींनी व्यक्त केली.

Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधी आत सोनिया गांधींसोबत राहणार

राहुल गांधी त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहायला गेले. जवळपास दोन दशके ते तिथे राहत होते. यावेळी सोनिया गांधीही उपस्थित होत्या.

Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधींनी सत्य सांगितले

प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की, माझा भाऊ जे काही बोलत आहे ते खरे आहे. आम्ही घाबरत नाही. भावाने जे सांगितले ते अगदी खरे आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

बंगल्यावर आलेल्या सहकाऱ्यांना नमस्कार

बंगला सोडताना राहुल गांधींसोबत त्यांच्या पक्षातील काही सहकारीही बंगल्यावर दाखल झाले होते.

Rahul Gandhi | Sarkarnam

बंगल्यात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना नमस्कार

इतके वर्षे बंगल्यात काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा त्यांनी हात जोडून निरोप घेतला. यावेळी त्यांचे सहकारीही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले

Rahul Gandhi | Sarkarnama

काँग्रेसकडून मेरा घर आपका घर अभियान

सरकार राहुल गांधींना झालेल्या या कारवाईनंतर काँग्रेसने सोशल मीडियावर मेरा घर आपका घर मोहीम सुरू केली आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधी बंगल्यावरुन जनपथकडे रवाना झाले

बंगला पुर्णपणे रिकामा केल्यानंतर राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले.

Rahul Gandhi | Sarkarnama

Ashok Stambh: सारनाथच्या अशोक स्तंभासारखे स्तंभ भारतात आणखी कुठे आहेत; पाहा खास फोटो!

Ashok Stambh | Sarkarnama