Narendra modi: मोदींना सोडावं लागेल 2023 च्या मध्यात पंतप्रधानपद ?

सरकारनामा ब्यूरो

भाजपने लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे.

Narendra Modi | Sarkarnama

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ ला मोदीचं पंतप्रधान असणार अशी घोषणा केली आहे. पण याचवेळी भाजप नेत्याच्या एका ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Amit Shah | Sarkarnama

माजी खासदार व भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा स्वामी त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत आले आहे.

Subramanian Swamy | Sarkarnama

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरुन दूर करण्याची मागणी केली आहे.

Subramanian Swamy | Sarkarnama

"जर डोवाल यांना पदावरुन दूर केलं नाही तर मोदींना 2023 च्या मध्यात पंतप्रधानपद सोडावं लागू शकतं," असा इशारा स्वामी यांनी दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Subramanian Swamy's Tweet: | Sarkarnama

"पेगासस टेलिफोन टॅपिंगसारखी चूक डोवाल यांनी अनेकदा केली आहे," असं स्वामी म्हणाले.

Ajit dowal | Sarkarnama

स्वामी हे नेहमीच विरोधकांना खडेबोल सुनावताना दिसतात, तर कधी ते पक्षालाच घरचा आहेर देतात. 

Subramanian Swamy | Sarkarnama