Nitin Gadkari: नितीन गडकरींनी केली दोन पालखी मार्गाची हवाई पाहणी; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

आळंदी ते पंढरपूर या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

Sarkarnama

त्यासोबतच गडकरी यांनी देहू व पंढरपूर या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.

Sarkarnama

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा 234 किमी लांबीचा आहे.

Sarkarnama

हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर असा महामार्ग असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे.

Sarkarnama

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस - बारामती - इंदापूर - अकलुज - बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे.

Sarkarnama

पालखी मार्गावर वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.

Sarkarnama

पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी या बाबींवर आधारित काम करण्यात येईल.

Sarkarnam