Independent MLA : महाराष्ट्रातील १३ अपक्ष आमदार, ज्यांनी केला प्रस्थापित पक्षांचा पराभव; पाहा फोटो!

Chetan Zadpe

आमदार रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या प्रिती बंड यांचा पराभव केला. राणा यांना ९०४३० मते तर बंड यांना ७४९१९ मते मिळाली होती. यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला.

Ravi Rana | Sarkarnama

आशिष जैस्वाल यांनी नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. जैस्वाल यांना ६७४१९ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात भाजप उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी ४३००६ मते मिळाली.

Ashish Jaiswal | Sarkarnama

अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. भोंडेकर यांना १०१७१७ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार अरविंद भालधरे ७८०४० मते मिळाली.

Narendra Bhondekar | Sarkarnama

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मतदारसंघातून प्रकाश आवाडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. आवाडे यांना ११६८६६ मते मिळाली. तर त्यांनी भाजप उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा पराभव केला. हाळवणकर यांना ६७०७६ मते मिळाली.

Prakash Awade | Sarkarnama

नाशि्क जिल्ह्याच्या साक्री मतदारसंघातून मंजुळा गावित अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. निवडणुकीत त्यांना ७६१६६, तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार मोहन सुर्यवंशी ६८९०१ मते मिळाली.

Manjula Gavit | Sarkarnama

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष चंद्रकांत निंबा पाटील विजयी झाले. पाटील यांना ९१०९२ मिळाली. त्यांनी दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंचा पराभव केला. खडसे यांना ८९१३५ मते मिळाली.

Chandrakant Patil | Sarkarnama

गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल १०२९९६ इतकी मते घेत विजय मिळवला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजप उमेदवार गोपालदास अग्रवाल यांना ७५८२७ मते मिळाली.

Vinod Agrawal | Sarkarnama

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ११७५७० मते घेतली. त्यांनी भाजपचे शामकुळे यांचा पराभव केला. शामकुळे यांना अवघी ४४९०९ मते मिळाली.

Kishor jorgewar | Sarkarnama

मिरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघातून गीता जैन यांनी ७९५७५ मते घेऊन विजय मिळवला. तर भाजरचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव झाला. मात्र विजयानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

Geeta Jain | Sarkarnama

उरण या मतदारसंघातून अपक्ष आमदार महेश बालदी विजयी झाले होते. बालदी यांना ७४५४०९ मते मिळाली तर शिवसेना उमेदवार मनोहर गजानन बोईर यांना ६८८३९ मिळाली होती.

Mahesh Baladi | Sarkarnama

सोलापूधील करमाळा या विधानसभा मतदारसंघातून संजय मामा शिंदे यांचा अपक्ष आमदार म्हणून निवड झाली. शिंदे यांना ७८८२२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष नारायण पाटील यांना ७३३२८ मते मिळाली.

Sanjay Mama Shinde | Sarkarnama

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या मतदारसंघातून राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. राऊत यांना ९५४८२ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप सोपल यांना ९२४०६ मते मिळाली.

Rajendra Raut | Sarkarnama

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून राजेंद्र यड्रावकर यांनी विजय मिळवला. यड्रावकर यांना १०००३८ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार उल्हास संभाजी पाटील ६२२१४ मते मिळाली.

Rajendra Yadrawkar | Sarkarnama
Web Story | Sarkarnama