Prakash Ambedkar Political Journey : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ते 'वंचित'चे शिल्पकार...!

Deepak Kulkarni

दिग्गज राजकीय नेते:

प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील एक दिग्गज राजकीय नेते आणि माजी खासदार आहेत.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

जन्म

प्रकाश आंबेडकर यांचा जन्म 10 मे 1954 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे ‘प्रकाश’ हे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवल्याचे सांगितले जाते.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

ओळख:

प्रकाश यशवंत आंबेडकर हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि वकील आहेत.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

राजकीय सुरुवात :

सुरुवातीला आंबेडकर हे बाबासाहेबांच्या संकल्पनेतून 1957 मध्ये स्थापना झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षामध्ये कार्यरत होते.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

पक्षाची स्थापना:

4 जुलै 1994 रोजी प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या राजकीय स्थापना केली.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

खासदारकीची वाटचाल

1990 ते 1996, 1998 ते 1999, आणि 1999 ते 2004 या कालावधीमध्ये खासदार राहिले.त्यानंतरही त्यांनी अनेक लोकसभा निवडणुका लढवल्या. मात्र त्यांना यश मिळाले नाही.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

राजकीय कारकीर्दीला कलाटणी

कोरेगाव भीमा येथे झालेल्या जातीय हिंसाचारानंतर प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील जनतेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली. तो बंद यशस्वी झाला.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

वंचितची स्थापना:

२०१८ मध्ये नवीन राजकीय कृती म्हणून वंचित बहुजन आघाडी या नवीन पक्षाची स्थापना केली

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

एमआयएमशी युती

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम आणि वंचित यांची युती केली.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

ठाकरे गटाशी युती

जानेवारी 2023 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाशी युती केली आहे.

Prakash Ambedkar Political Journey | Sarkarnama

NEXT : 'जिथं तिथं' फक्त मोदींच्याच लुकची हवा, पाहा हटके 'दहा' फोटो!