Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकरांची अनोखी लव्हस्टोरी; पाहा खास फोटो

Chetan Zadpe

या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आंदोलनात पाठिशी खंबीर उभ्या राहणाऱ्या शर्वरी आणि रविकांत यांच्या 'लव्हस्टोरी'वर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Ravikant Tupkar | Sarkarnama

सुखवस्तू वकीली कुटुंबातील मुलगी, माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची निवड तू कशी केलीस? हे मला पडलेलं कोडं आहे, अशा भावना तुपकरांनी व्यक्त केल्या.

Ravikant Tupkar | Sarkarnama

आज इतकी वर्षे संसार यशस्वी केलास. आपली ओळखही कोर्टातलीच, "कोर्टाची पायरी चढली, आणि लग्नाची बेडी पडली", अशी आपली लव्हस्टोरी, असे तुपकर म्हणाले.

Ravikant Tupkar | Sarkarnama

"तू वकील म्हणून ग्रेट आहेसच, पण एक पत्नी, सून, आई, सहकारी आणि माणूस म्हणून तू सर्वोत्तम आहेस," असं ही ते त्यांच्या पत्नीबद्दल म्हणतात.

Ravikant Tupkar | Sarkarnama

"तुझी वकिली, माझी आंदोलनं, तू सगळं कसं एकहाती सांभाळतेस. ही तारेवरची कसरत कशी जमवतेस? असा प्रेमळ सवाल ही त्यांनी पत्नीला फेसबुक पोस्टमधून विचारला."

Ravikant Tupkar | Sarkarnama

"तुला कधी निवांत फिरायला नेलं नाही, भेटवस्तू दिल्या नाहीत, शांतपणे बसून तुझी चौकशीही केली नाही, याची सल मनात आहे, अशी खंत तुपकरांनी बोलून दाखवली."

Ravikant Tupkar | Sarkarnama

"मी तुझ्यासाठी बदलावं हे तुला कदापी सहन होणार नाही. त्यामुळे तुला आवडणारा लढवय्या रविकांत म्हणूनच मी नेहमी तसाच राहीन असा तुला शब्द देतो," असे ही ते त्यांच्या पत्नीला म्हणाले.

Ravikant Tupkar | Sarkarnama

Next: स्वातंत्र्य लढ्यातील समाजवादी विचारसरणीचे आघाडीचे नेते राम मनोहर लोहिया, यांचा राजकीय प्रवास