Ram Manohar Lohia: स्वातंत्र्य लढ्यातील समाजवादी विचारसरणीचे आघाडीचे नेते राम मनोहर लोहिया, यांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्या 'राम मनोहर लोहिया' यांची आज जयंती.

Ram Manohar Lohia Birthday | Sarkarnama

देशात लोकशाही आणि समाजवादी विचारसरणीचे लोण पसरविणारे स्वातंत्र्य लढ्यातील आघाडीचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.

Ram Manohar Lohia Birthday | Sarkarnama

23 मार्च 1910 रोजी जन्मलेल्या राम मनोहर लोहिया यांचे शिक्षण कोलकाता, मुंबई आणि बर्लिन येथे झाले.

Ram Manohar Lohia Birthday | Sarkarnama

बर्लिनवरून 'पीएचडी' मिळवून ते भारतात परतले आणि सरकारी नोकरीचे आमिष लाथाडून स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी ‘चले जाव’ आंदोलनात उतरले.

Ram Manohar Lohia Birthday | Sarkarnama

1942 च्या ‘चलेजाव’ आंदोलनादरम्यान झालेल्या प्रतिकार सामर्थ्याचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

Ram Manohar Lohia Birthday | Sarkarnama

1955 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ते संसद सदस्य होते.

Ram Manohar Lohia Birthday | Sarkarnama

समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणार्‍या लोहियांनी समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित करण्याची भूमिका मांडली.

Ram Manohar Lohia Birthday | Sarkarnama

लोहिया यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत लेखन केले आहे. त्यांनी अनेक भाषणे, घटनांचे विश्लेषण करणारी भाषणे लिहिली आहेत. ती गुप्त रेडिओ केंद्रातून प्रसारित होत.

Ram Manohar Lohia Birthday | Sarkarnama

Next: मनसेचे 'ते' 13 आमदार कुठे गेले ?कोणी पक्ष सोडला तर कुणी...