Dynasty Politics in BJP : इतर राजकीय पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपमध्येही घराणेशाही : पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

अनुराग ठाकूर :

भाजपचे ज्येष्ठ नेते व हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाल यांचे पुत्र अनुराग ठाकूर हिमाचलमधील हमीरपूरचे लोकसभामतदारसंघातून खासदार आहेत.

Anurag Thakur | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गंगाधरपंत फडणवीस यांचे पुत्र आहेत. गंगाधरपंत हे विधानपरिषदेवर आमदार होते. तसेच फडणवीस यांची काकू शोभा फडणवीस या ही राज्यामध्ये मंत्री पदावर कार्यरत होत्या.

Devendra Fadnavis | Sarkarnama

पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे :

भाजपाचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्या राजकारणात आहेत. पंकजा मुंडे या राज्याच्या मंत्री होत्या. तर वडीलांच्या निधनानंतर बीडमधून प्रितम मुंडे या खासदार म्हणून निवडून आले.

Pankaja munde And Pritam Munde | Sarkarnama

पूनम महाजन :

भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या मुंबईतून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. ते सलगपण दोनवेळा खासदारपदी निवडून आले.

Poonam Mahajan | Sarkarnama

हिना गावित :

भाजप नेते विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित या ही राजकारणात सक्रिय आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या.

Heena Gavit | Sarkarnama

दुष्यंतसिंग शिंदे :

भाजप नेत्या व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंतसिंग हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. धौलपूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत .

Dushyant sinhg | Sarkarnama

ज्योतिरादित्य शिंदे :

भाजप नेत्या वसुंधराराजे यांचे बंधू माधवराव शिंदे हे ही काँग्रेसचे दिग्गज नेते होते. त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपप्रवेश केला आहे.

jyatiraditya Scindhia | Sarkarnama

यशोधराराजे शिंदे :

भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांची बहीण यशोधरा राजे शिंदे या ही मध्य प्रदेश शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदी कार्यरत होत्या.

Yashodhara Raje Scindhia | Sarkarnama

विजया राजे शिंदे :

भाजप नेत्या वसुंधराराजेंच्या घराण्यामधील राजकीय घराणेशाही ही मुळात त्यांची आई विजयाराजे यांच्यापासून सुरू होते. विजया राजे खासदारपदी निवडून आल्या होत्या. जनसंघ त्यानंतर भाजपाच्या स्थापनेपासून ते राजकारणात सक्रिय होत्या.

Vijaya Raje Scindhia | Sarkarnama

अभिषेकसिंग :

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री असलेले भाजपचे बडे नेते रमणसिंग यांचे पुत्र अभिषेकसिंग हे लोकसभेमध्ये खासदारपदी ही राहिलेले होते.

Abhishek Singh | Sarkarnama

पर्वेश वर्मा :

भाजपा बडे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र पर्वेश वर्मा दिल्ली मतदारसंघातून १६ व्या लोकसभेत निवडून आले होते.

Parvesh Varma | Sarkarnama

पंकज सिंग :

उत्तर प्रदेशमधून आमदार असणारे आणि उत्तर प्रदेश भाजप कार्यकारिणीत सचिवपदी जबाबदारी सांभाळणारे पंकज सिंग हे गृहमंत्री राजनाथ सिंग याचे पुत्र आहेत.

Pankaj Singh | Sarkarnama

राजीव सिंग :

राजस्थानचे राज्यपाल राहिलेले व भाजपचे बडे नेते दिवंगत कल्याणसिंग यांचे पुत्र राजीव सिंग हे भाजपाचे खासदार आहेत.

Rajiv Singh | Sarkarnama

NEXT : वेदोक्त-पुराणोक्त वादात चर्चेत आलेल्या संयोगीताराजे छत्रपती...

Web Story | Sarkarnama