Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींच्या आधीदेखील अनेकांची झाली होती आमदारकी- खासदारकी रद्द

सरकारनामा ब्यूरो

'मोदी'आडनावावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमवावी लागली आहे. राहुल गांधी यांच्यापूर्वीही काही लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची कारवाई झाली होती.

Rahul Gandhi Disqualified as MP News | Sarkarnama

जयललिता : तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची २००२ मध्ये भष्ट्राचार प्रकरणी तर २०१४ मध्ये आयकर विभागाच्या केलेल्या कारवाईमुळे त्यांची दोन वेळा आमदारकी रद्द करण्यात आली होती.

Jaylalitha Disqualified as MP | sarkarnama

लालू प्रसाद यादव : माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांना ३ आँक्टोबर २०१३ मध्ये चारा गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

Lalu prasad yadav Disqualified as MP | Sarkarnama

आजन खान : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आजम खान यांना वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती.

Azam Khan Disqualified as MP News | sarkarnama

विक्रम सैन : भाजपचे आमदार सैन यांना २०१३ मध्ये मुजफ्फरपूर दंगल प्रकरणात दोन वर्ष शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती.

Vikram Singh Saini Disqualified as MP | sarkarnama

कुलदीप सिंह सैंगर : उन्नाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सैंगर यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना आमदारकी गमवावी लागली.

Kuldeep Singh Sengar Disqualified as MP | sarkarnama

महमंद फैजल : गेल्या 13 जानेवारी रोजी लक्षव्दीप सत्र न्यायालयाने एका खूनप्रकरणी राष्ट्रवादीचे फैजल यांना दोषी ठरवले होते. त्यांच्यावर लोकसभा सचिवालयाने कारवाई करुन खासदारकी रद्द केली होती. त्यांना पोटनिवडणुक लढविण्यास मनाई केली होती.

Mohammed Faizal P. P Disqualified as MP | Sarkarnama

Next: राहुल गांधींना खासदारकी गमावण्याची वेळ आणणारे, कोण आहेत पूर्णेश मोदी