Priyanka Chaturvedi : लेखिका ते खासदार, कसा आहे प्रियंका चतुर्वेदी यांचा राजकीय प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा जन्म 19 नोव्हेंबर, 1979 झाला. त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील आहेत.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

त्यांना लेखनाची मोठी आवड आहे. त्यांनी तेहेल्का मासिक, 'डीएनए' वृत्तपत्र आणि 'फर्स्टस्पॉट'मध्ये लेखन केले आहे.  

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी 'एमपॉवर कन्सल्टन्ट मीडिया, पीआर आणि इव्हेंट मॅनेजमेंट' कंपनीत संचालक म्हणून काम केलं आहे.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

पुस्तकांचं विश्लेषण करणारा ब्लॉगही त्या लिहितात. हा ब्लॉग देशातल्या पहिल्या 10 ब्लॉगपैकी एक आहे. 

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

प्रियंका चतुर्वेदी दोन स्वयंसेवी संस्था चालवतात. या संस्थेच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण, महिला सशक्तिकरण आणि आरोग्याशी निगडित समस्यांवर संस्थेमार्फत काम केले जाते.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

प्रियंका चतुर्वेदी यांनी 2010 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या काँग्रेसच्या सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चतुर्वेदींशी गैरवर्तणूक केली, या गंभीर प्रकरणाची पक्षानं दखल घेतली नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

19 एप्रिल, 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील प्रवेशानंतर त्यांनी अतिशय आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडली आहे.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama