First Women IAS Officer in India : भारतातील पहिल्या महिला 'IAS' अधिकारी तुम्हाला माहीत आहे का?

सरकारनामा ब्यूरो

स्वतंत्र भारताच्या पहिला महिला 'आयएएस' अधिकारी अण्णा राजम मल्होत्रा ​​होत्या.

Anna Rajam Malhotra first IAS | Sarkarnama

त्यांचा जन्म 17 जुलै 1924ला केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात झाला होता.

Anna Rajam Malhotra first IAS | Sarkarnama

अण्णा राजम मल्होत्रा ​​यांचे शालेय शिक्षण केरळमधील कोझिकोड येथून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठात प्रवेश घेतला.

Anna Rajam Malhotra first IAS | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 'यूपीएससी' परीक्षेत यश मिळवले होते. 1951 मध्ये त्या 27 वर्षांच्या असताना भारतीय नागरी सेवेत (IAS) रुजू झाल्या.

Anna Rajam Malhotra first IAS | Sarkarnama

देशसेवेसाठी अण्णा राजम मल्होत्रा ​​यांना भारत सरकारने 1989 मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले.

Anna Rajam Malhotra first IAS

'आयएएस' झाल्यानंतर अण्णा राजम यांनी आपल्या कार्यकाळात देशाचे दोन पंतप्रधान आणि सात मुख्यमंत्र्यांसोबत काम केले.

Anna Rajam Malhotra first IAS | Sarkarnama

स्वतंत्र भारताच्या पहिला महिला सनदी अधिकारी अण्णा राजम मल्होत्रा यांनी 2018 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Anna Rajam Malhotra first IAS | Sarkarnama

Next: राहुल गांधींच्या आधीदेखील अनेकांची झाली होती आमदारकी- खासदारकी रद्द