Urmila Matondkar Birthday: 'रंगीला गर्ल' ते राजकारणी; उर्मिला मातोंडकर यांचा प्रवास, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा आज (4 फेब्रुवारी ) 49 वा वाढदिवस आहे.

Urmila Matondkar | Sarkarnama

1977 मध्ये बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली.

Urmila Matondkar | Sarkarnama

उर्मिला यांनी अवघ्या नऊ वर्षाच्या वयात मराठी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटामध्ये काम केले.

Urmila Matondkar | Sarkarnama

उर्मिला यांनी 'नरसिंह' चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. खऱ्या अर्थाने 1995 मध्ये रामगोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' या चित्रपटाच्या यशाने त्यांची कारकीर्द नव्या उंचीवर पोहोचवली.

Urmila Matondkar | Sarkarnama

2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

Urmila Matondkar | Sarkarnama

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला.

Urmila Matondkar | Sarkarnama

मातोंडकर यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Urmila Matondkar | Sarkarnama

अभिनेत्री कंगना राणावत यांच्या भूमिकांना आव्हान दिल्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या.

Urmila Matondkar | Sarkarnama

मुंबई पोलिसांवर टीका केल्यानंतर कंगना राणावत यांनी मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कंगनावर निशाणा साधला होता.

Urmila Matondkar | Sarkarnama

नुकताच त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता.

Urmila Matondkar | Sarkarnama