Nagpur Teacher Election : भाजपच्या नागपुरात 'मविआ'चा झेंडा ; या 'चार' कारणांमुळे सुधाकर अडबाले यांचा विजय...

सरकारनामा ब्यूरो

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा दणदणीत विजय.

Sudhakar Adbale | Sarkarnama

अडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचा तब्बल सात हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

Sudhakar Adbale | Sarkarnama

मुळचे चंद्रपूरचे असलेले सुधाकर आडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते आहेत. गणिताचे शिक्षक असलेले आडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचारधारेच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत.

Sudhakar Adbale | Sarkarnama

सुधाकर अडबाले यांच्या विजयाची 'चार' कारणे काय आहेत? हे जाणून घेऊया..

Sudhakar Adbale | Sarkarnama

जनसंपर्क वाढवला

अडबाले यांनी मागील दोन वर्षांपासून अधिकृतपणे तयारी सुरु केली होती. दोन वर्षात सहाही जिल्ह्यात संपर्क, संघटनांची बांधणी करत सुधाकर अडबाले यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी विजय सोपा झाला.

Sudhakar Adbale | Sarkarnama

गटबाजींचा फायदा अडबालेंना

गाणार यांना भाजपमधीलच गटबाजी भोवल्याची चर्चा आहे. त्यांच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये सुरुवातीपासून दोन गट होते. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत नाराजीजा फटका गाणार यांना बसला आहे.

Sudhakar Adbale | Sarkarnama

गाणार यांच्यावरच्या नाराजीचा अडबालेंना फायदा

जुन्या पेन्शन योजनेवरुन गाणार यांच्या विरोधात शिक्षकांची नाराजी होती. त्यामुळे शिक्षकांनी काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या पारड्यात मते टाकली.

Sudhakar Adbale | Sarkarnama

एकसंघ होऊन निवडणूक लढल्याचा काँग्रेसला फायदा

महाविकास आघाडीमध्ये चांगला समन्वय साधत अडबाले यांच्या विजयासाठी एकसंघ पणे मैदानात उतरली. त्यामुळे अडबालेंच्या विजय झाला.

Sudhakar Adbale | Sarkarnama