Shivrajyabhishek Sohala 2023 : डोळ्यांचे पारणे फेडणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा; पाहा खास फोटो...

Deepak Kulkarni

३५० वा राज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक दिन तिथीनुसार आज( दि.२) रायगडावर धुमधडाक्यात साजरा होत आहे.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

राज ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत सकाळीच रायगडावर दाखल झाले होते. या सोहळ्याला किल्ले रायगडावर शिवप्रेमींचा सागर लोटला आहे.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

सोहळ्याला सकाळपासून सुरुवात

छत्रपतींच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याला सकाळपासून सुरुवात झाली.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

शिवरायांच्या मूर्तीची पूजन...

या सोहळ्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विधिवत पूजन व आरती करण्यात आली.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

जयजयकारांनी आसमंत दुमदुमला..

यावेळी राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींकडून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या जयजयकारांनी आसमंत दुमदुमला.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

रायगडावर फुलांची आकर्षक सजावट

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

चांदीचा पूर्णाकृती पुतळा

छत्रपती शिवरायांच्या बसलेल्या स्थितीतील चांदीचा पूर्णाकृती पुतळा पालखीसाठी सजवण्यात आला.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

पोलिसांची मानवंदना...

पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

उदयनराजेंची मागणी मान्य..

खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतापगड प्राधिकरणाची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा..

विविध ढोलपथकांनी देखील याठिकाणी वादन केले. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा राहिला.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Sarkarnama

NEXT : 'आयएएस' अधिकाऱ्यांना किती पगार मिळतो; गाडी, बंगल्यांसह कोणत्या सुविधा मिळतात? वाचा!