IAS Officer Salary: 'आयएएस' अधिकाऱ्यांना किती पगार मिळतो; गाडी, बंगल्यांसह कोणत्या सुविधा मिळतात? वाचा!

Ganesh Thombare

'आयएएस'च्या कामांबाबत...

अनेकांचं आयएएस अधिकारी व्होण्याचं स्वप्न असतं. मात्र, 'आयएएस'च्या कामांबाबत अनेकांना माहिती नसतं. याविषयीची माहिती पाहूयात.

सर्वात कठीण परीक्षा

'आयएएस' होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा द्यावी लागते. ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

IAS होण्याची संधी कुणाला मिळते?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवारांना IAS होण्याची संधी मिळते.

'आयएएस'चं कामं काय असतं?

भारतीय प्रशासकीय सेवेतील विविध मंत्रालये आणि प्रशासन विभागांमध्ये आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते.

'आयएएस'ला पगार किती मिळतो?

सातव्या वेतन आयोगानुसार IAS अधिकाऱ्याला 56100 रुपये मूळ वेतन मिळते. याशिवाय TA, DA आणि HRA भत्ते मिळतात.

'आयएएस'साठी सर्वोच्च पद कोणतं?

आयएएस अधिकारी पदोन्नतीनंतर कॅबिनेट सचिव पदावर पोहोचू शकतो.

पगाराव्यतिरिक्त 'या' सुविधा मिळतात

महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, अनुदानित बिल, वैद्यकीय भत्ता, वाहतूक भत्ता, घर, सुरक्षा, स्वयंपाकी, वाहनचालक.

'आयएएस'साठी UPSC ची परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा, मुलाखत यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आयएएस रँक मिळविणाऱ्या उमेदवारांना देशातील प्रशासन व्यवस्थेत काम करण्याची संधी मिळते.

Next : IAS अधिकाऱ्याच्या ; जबाबदाऱ्या आणि अधिकार