C.Rajagopalachari : नेहरूंविरोधात ‘स्वतंत्र पक्ष’ स्थापन करणारे, स्वतंत्र भारताचे पहिले ‘भारतीय’ गव्हर्नर जनरल!

Rashmi Mane

जन्म

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्म १० डिसेंबर १८७८ रोजी मद्रासच्या थोरपल्ली गावात झाला.

Chakravarthi Rajagopalachari | Sarkarnama

पहिले भारतीय गव्हर्नर जनरल

रोजगोपालाचारी यांना 'राजाजी' या नावानेही ओळखले जाते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते.

Chakravarthi Rajagopalachari | Sarkarnama

गांधीजींचे निकटवर्तीय

त्यांनी मद्रास कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. राजगोपालाचारी हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते आणि ते महात्मा गांधींच्या जवळचे मानले जायचे.

Chakravarthi Rajagopalachari | Sarkarnama

'यंग इंडिया'चे संपादक

गांधीजींच्या ‘यंग इंडिया’चे ते संपादक होते. राजाजी हे गांधीजींचे व्याही देखील होते. गांधीजींचे चिरंजीव देविदास यांचं लग्न राजाजींची कन्या लक्ष्मी हिच्याबरोबर झालं होतं.  

काँग्रेसचे सरचिटणीस

राजगोपालाचारी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती.

Chakravarthi Rajagopalachari | Sarkarnama

गृहमंत्री म्हणून नियुक्ती

1950 मध्ये त्यांना जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये 'गृहमंत्री' करण्यात आले होते.

Chakravarthi Rajagopalachari | Sarkarnama

मद्रासचे मुख्यमंत्री

1952 मध्ये राजगोपालाचारी यांनी मद्रासचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

'स्वतंत्र पक्षा'ची स्थापना

नेहरूंशी वैचारिक मतभेद असल्याने त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन केला, ज्याचे नाव ' स्वतंत्र पक्ष' असे होते.

भारत रत्न पुरस्कार

स्वातंत्र्य लढ्यापासून ते नंतरपर्यंत देशाची सेवा केल्याबद्दल त्यांना 1954 मध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मामित करण्यात आले होते.

Next: "सुईच्या टोकाएवढंही कोणी अतिक्रमण करु शकत नाही"; अमित शाह