Karnataka Election : दोन सख्ये भाऊ एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात; पाहा खास फोटो!

Ganesh Thombare

लक्षवेधी लढत

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीत एक लक्षवेधी लढत होत आहे.

Sarkarnama

पारंपारिक मतदारसंघ

शिमोगा जिल्ह्यातील सोरबा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री बंगारप्पा यांचा पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. बंगारप्पा हे 1967 ते 1994 या काळात निवडून येत होते.

Sarkarnama

एस. बंगारप्पा यांचे पुत्र

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.बंगारप्पा यांचे मधू बंगारप्पा आणि कुमार बंगारप्पा हे पुत्र आहेत.

Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.बंगारप्पा यांचे पुत्र आणि मधू बंगारप्पा यांनी काही महिन्यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Sarkarnama

सख्या भावांमध्ये लढत

कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील सोरबा विधानसभा मतदारसंघात मधू बंगारप्पा आणि कुमार बंगारप्पा या दोन सख्या भावांमध्ये ही लढत होत आहे.

Sarkarnama

एकाला भाजप तर दुसऱ्याला काँग्रेसचे तिकीट

कुमार बंगारप्पा आणि मधू बंगारप्पा दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. एकाला भाजपने तर दुसऱ्याला काँग्रेसने तिकीट दिले आहे.

Sarkarnama

या आधीही दोघांत झाली होती लढत

2018 च्या विधानसभा निवडणुकीतही सोरबा विधानसभा मतदारसंघातूनच कुमार बंगारप्पा यांनी मधू बंगारप्पा यांचा 3 हजार मतांनी पराभव केला होता.

Sarkarnama

दोघांनाही उमेदवारी

भाजपच्या तिकीटावर कुमार बंगारप्पा हे दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून मधू बंगारप्पा आहेत.

Sarkarnama

फिल्म इंडस्ट्रीत काम

राजकारणाव्यतिरिक्त दोन्ही भाऊ कन्नड फिल्म इंडस्ट्रीत काम करतात. कुमार बंगारप्पा हे प्रसिद्ध अभिनेते तर मधू बंगारप्पा हे एक चित्रपट निर्माते आहेत.

Sarkarnama

Next : कोचिंगशिवाय दुसऱ्याच प्रयत्नात झाली 'IPS' ऑफिसर ; बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत तिच्या सौंदर्यासमोर फिक्या

Sarkarnama