Gargi Phule join NCP: राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या; गार्गी फुले नक्की आहेत तरी कोण?

Rashmi Mane

गार्गी फुले

अभिनेत्री गार्गी फुले यांनी आज (30मे ) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Gargi Phule, Ajit Pawar, Sunil Tatkare | Sarkarnama

पक्षप्रवेश

राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील, खासदार सुनील तटकरे, सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

Gargi Phule, Ajit Pawar, Sunil Tatkare, Jayant Patil | Sarkarnama

निळू फुले यांच्या कन्या

गार्गी फुले या दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या आहेत. गार्गी आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत.

Gargi Phule and Nilu Phule | Sarkarnama

अधिराज्य

आपल्या दर्जेदार अभिनयाने निळू फुले यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले आहे. सुमारे २५० मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.

Gargi Phule and Nilu Phule | Sarkarnama

शिक्षण

गार्गी फुले यांनी 'स्त्रीमुक्ती' या विषयात पदवी घेतली आहे. अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांच्या वजिलांकडूनच मिळालं.

Gargi Phule | Sarkarnama

चित्रपट सृष्टी

गार्गी फुले नाटक आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून,1998 पासून त्यांनी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रायोगिक नाट्य चळवळीत त्या चांगल्याच सक्रीय आहेत.

Gargi Phule | Sarkarnama

या नाटकांमध्ये कामं

गार्गी फुले यांनी आतापर्यंत मळभ (किरण यज्ज्ञपावीत), कोवळी उन्हे (विजय तेंडुलकर), श्रीमंत (विजय तेंडुलकर), सोनाटा (महेश एलकुंचवर), वासंसी जीर्णनी (महेश एलकुंचवर), सुदामा के चावल (वसंत देव), या नाटकात काम केले आहे.

Gargi Phule | Sarkarnama

या मालिकांमध्येही कामं

राजा राणी ची गं जोडी (colors मराठी), सुंदरा मनामध्ये भरली (colors मराठी), तुला पाहते रे (zee टीव्ही), कट्टी बट्टी (zee युवा), या टीव्ही मालिकांमध्ये गार्गी फुले यांनी काम केले आहे. भाडीपा चिकटगुंडे, राते या वेबसीरीजमध्येही त्यांनी काम केलं आहे.

Gargi Phule | Sarkarnama

सरपंच ते आमदार; 'असा' आहे दिलीप मोहिते पाटलांचा राजकीय प्रवास