सकाळी भाजपकडून मिसिंगची तक्रार अन् दुपारी सरनाईक मतदारसंघात हजर - after missing complaint shivsena mla pratap sarnaik appeared | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

सकाळी भाजपकडून मिसिंगची तक्रार अन् दुपारी सरनाईक मतदारसंघात हजर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे बेपत्ता असल्याची तक्रार आज सकाळी भाजपने केल्यानंतर ते मतदारसंघात अवतरले. 

ठाणे : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक  (Pratap Sarnaik) हे बेपत्ता असल्याची तक्रार आज सकाळी भाजपकडून (BJP) वर्तकनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. यानंतर शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त सरनाईक हे  मतदारसंघात अवतरले. ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी आमदार निधीतून एक कोटी रूपयांच्या कार्डियाक रूग्णवाहिकांचे लोकार्पण आज सरनाईक यांच्या हस्ते झाले. मतदारसंघासाठी काही करीत नसल्याचा आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांनाही त्यांनी यातून चपराक लगावली आहे. 

आमदार प्रताप सरनाईक हे बेपत्ता असल्याची तक्रार आजच भाजपने केली होती. या वेळी 'आमदार झाले Mr.india' असे बॅनर घेऊन भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. सरनाईक हे मातोश्रीवर असल्याचा आरोप भाजपने केला होता. सरनाईक हे गेल्या १०० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा आरोपही भाजपने केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे आणि ५० कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करुन हे आंदोलन केले होते. 

सकाळी भाजपचे आंदोलन झाल्यानंतर सरनाईक मतदारसंघात दाखल झाले. शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी आमदार निधीतून एक कोटी रूपये खर्च करून सरनाईक यांच्या हस्ते कार्डियाक अॅम्बुलन्सचे लोकार्पण आज झाले. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी दोन-दोन कार्डियाक अँब्युलन्स आमदार निधीतून महापालिकेला दिल्या आहेत. यावर्षीही त्यांनी आमदार निधीतून कार्डियाक अँब्युलन्ससोबत मोक्षरथही दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता या कार्डियाक अँब्युलन्समध्ये लहान मुलांना लागणारे ऑक्सिजन सिलिंडर तसेच घरातून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे आहेत. याचबरोबर रूग्णांच्या सेवेसाठी नर्स व डॉक्टरांचीही मोफत सुविधा असणार आहे. 

हेही वाचा : खबरदार, जिल्ह्याबाहेर गेल्यास होम क्वारंटाईन करणार! 

रूग्ण मृत्युमूखी पडल्यानंतर रूग्णांलयातून किंवा घरातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी अँब्युलन्समधून तर कधी-कधी खासगी वाहनातून मृतदेह न्यावा लागतो. त्यातही अँब्युलन्समधून किंवा खासगी वाहनातून कोरोनाने मृत झालेल्या रूग्णास स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर त्या गाडीचे योग्य प्रकारे सॅनिटायजेशन न केल्यामुळे इतर लोकांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी मोक्षरथाची सुविधा देण्यात आली असून मोक्षरथासाठी मृतांच्या नातेवाईकांनी महानगरपालिकेला कळविल्यानंतर शववाहिकेची महानगरपालिकेतर्फे मोफत सेवा पुरविण्यात येणार आहे. 

या प्रसंगी नगरसेविका परिषा सरनाईक, युवा सेना सचिव-नगरसेवक पुर्वेश सरनाईक, लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्षा आशा संदीप डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश शेंदारकर, डॉ. वैशाली पालांडे, डॉ. अतुल जाधव, डॉ. निगम, विभागप्रमुख रामचंद्र गुरव, सामाजिक कार्यकर्ते संदिप डोंगरे, भगवान देवकाते, शिवसेना महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख