Will Bhausaheb Waghchaure contest from Shirdi on BJP's B - Form ? | Sarkarnama

शिर्डी लोकसभा मतदार संघात भाजपतर्फे भाऊसाहेब वाघचौरे लढणार?

सरकारनामा
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपतर्फे नगर जिल्ह्यात आणि राज्यात अन्य पक्षातील नावाजलेल्या , ताकदवान आणि  आणि इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या  नेत्यांना जेथे भाजप फार दुर्बळ  आहे अशा मतदारसंघात संधी दिली जाणार असून काहींशी बोलणी सुरु असल्याचे समजते . 

नगर :  सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपने जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे.

शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिवभाऊ लोखंडे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात कोणाला उतरवणार हे भाजपने कोणाला उतरवणार हे भाजपने अद्याप स्पष्ट केलेले नाही. उमेदवार कोणीही असला तरी विजय भाजपचाच झाला पाहिजे, अशी तयारी सुरू आहे.

मात्र भाजपतर्फे भाऊसाहेब वाघचौरे यांचे नाव पुढे येण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. भाऊसाहेब वाघचौरे दहा वर्षापूर्वी 2009 मध्ये भारिप नेते रामदास आठवले यांचा पराभव करून खासदार झाले होते. पण तेव्हा ते शिवसेनेत होते आणि आता ते भाजपमध्ये आहेत.तीन वर्षांपूर्वी भाऊसाहेब वाघचौरे भाजपच्या राहुटीत दाखल झालेले आहेत . अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि महत्वाच्या शिर्डी संस्थानांवर भाजपच्या कोट्यातून त्यांची वर्णी लावण्यात आलेली आहे . 

आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपतर्फे नगर जिल्ह्यात आणि राज्यात अन्य पक्षातील नावाजलेल्या , ताकदवान आणि  आणि इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या  नेत्यांना जेथे भाजप फार दुर्बळ  आहे अशा मतदारसंघात संधी दिली जाणार असून काहींशी बोलणी सुरु असल्याचे समजते . 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी कोपरगाव स्नेहलता कोल्हे, नेवासा- बाळासाहेब मुरकुटे या दोन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर कॉंग्रेस पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), बाळासाहेब थोरात (संगमनेर) आणि भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर) हे तीन आमदार आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वैभव पिचड हे अकोले मतदारसंघाचे आमदार आहेत.याशिवाय राहुरी विधानसभा मतदारसंघाचा काही भाग शिर्डी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतो. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे देखील भाजपचे आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील आघाडी निश्‍चित आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकार सम्राटांचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे.

त्यामुळे राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही. युतीच्या समविचारी मतांचे विभाजन होईल तर कॉंग्रेस आघाडीच्या समविचारी मतांचे ध्रुवीकरण होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी भाजपतर्फे स्वबळावर लढण्याची तयारी फारसा गाजावाजा न करता  विविध स्तरावर सुरु आहे 

शिर्डी मतदारसंघात भाजपने कशी जोरदार फिल्डींग लावली आहे आणि बुथनिहाय तयारी कशी चालली आहे, हे समजून घेण्यासाठी सोबतची बातमी वाचा. 

भाजपचे ऑपरेशन शिर्डी :  असे चाललेय बूथ मॅनेजमेंट​

संबंधित लेख