शशिकला निवडणूक लढणार नाहीत पण...पलानीस्वामी उपकारांची परतफेड करणार का?

मागील सुमारे अडीच ते तीन दशके तमिळनाडूतील राजकारणाला पडद्यामागून दिशा देणाऱ्या शशिकला आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देतील, अशी चिन्हे आहेत.
aiadmk leader sasikala can not contest tamil nadu assembly election
aiadmk leader sasikala can not contest tamil nadu assembly election

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची कारागृहातून 27 जानेवारीला सुटका होणे अपेक्षित आहे. शशिकलांना निवडणूक लढता येणार नाही मात्र, अण्णाद्रमुक पक्षाचा प्रमुख त्याच ठरवू शकतात, अशी अटकळ राजकीय विश्लेषक बांधत आहेत. ओ.पनीरसेल्वम  यांना बाजूला करीत ई. के. पलानीस्वामी यांना शशिकलांनी मुख्यमंत्री बनवले होते. आता पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम एकत्र असले तरी ते शशिकलांच्या उपकारांची परतफेड करणार का, असा प्रश्न उपस्थित होते आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात आहेत. शशिकला यांची शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 27 जानेवारीला अथवा त्याआधी सुटका होईल. शशिकला यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढता येणार नाही. मात्र, त्या पक्षाचा पुन्हा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढू शकतात. यातून त्या पक्षाचे सदस्यत्व मिळतील, अशी शक्यता आहे. 

पनीरसेल्वम आणि पनीरसेल्वम या दोन्ही नेत्यांना मोठे करण्यात शशिकला यांचा मोठा हात आहे. जयललिता यांच्या निधनानंतर बंडखोर पलानीस्वामींना बाजूला करत त्यांनी निकटवर्ती पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्रिपद बहाल केले होते. मात्र, नंतर पलानीस्वामी यांनी पनीरसेल्वम यांच्याशी हातमिळवणी करीत शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 

शशिकला यांचे पुतणे टी.टी.व्ही.दिनकरन यांनी स्वत:चा नवीन पक्ष स्थापन केला आहे. जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून विधासभेवर निवडून गेले आहेत. जयललिता यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीपासून सोबत असलेल्या शशिकला याच सरकार आणि पक्ष चालवत होत्या, असे मानले जाते. यामुळे अण्णाद्रमुकमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 

पलानीस्वामी यांच्यावर शशिकलांचा मोठा उपकार असून, राज्यातील सद्य:स्थिती पाहता ते विरोध करण्याच्या स्थितीत नाहीत. कारण दिनकरन यांच्या पक्षाला शशिकलांनी पाठबळ दिले तर ते अण्णाद्रमुकचीच मते खातील. यामुळे द्रमुकला फायदा होईल. शशिकलांसह दिनकरन यांना पक्षात स्वीकारण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. मात्र, पनीरसेल्वम यांच्या गटाला तो कितपत मान्य होईल, ही शंकाच आहे. मागील सुमारे अडीच ते तीन दशके राज्यातील राजकारणाला पडद्यामागून दिशा देणाऱ्या शशिकला आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देतील, अशी चिन्हे आहेत. 

यातच भाजप पुन्हा तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. द्रमुकला नामोहरम करण्यासाठी भाजपकडून अण्णाद्रमुकला मदत केली जात आहे.  शशिकला या तुरुंगातून सुटल्यास भाजप त्यांच्याशी जवळीक साधण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यांच्या राज्यातील राजकारणात सक्रिय होण्याने अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. राज्यात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यामुळे अण्णाद्रमुकची डोकेदुखी आणखी वाढू शकते.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com