देवदत्त निकम यांचे वक्तव्य आंबेगावात राजकीय भूकंप घडविणार : गिरे

देवदत्त निकम यांचे वक्तव्य आंबेगावात राजकीय भूकंप घडविणार : गिरे

शिक्रापूर : घासून नव्हे तर अगदी ठासून १८ हजारांचा दगाफटका मागील वेळी दिलीप वळसे पाटलांनी आपल्याला दिल्यानेच आपण पराभूत झाल्याची स्पष्ट कबूलीच देवदत्त निकम यांनी काल दिली. त्यामुळे या पुढील काळात निकम यांची वक्तव्ये आंबेगावच्या राजकारणात अनेक भूकंप करणार असल्याचा गौफ्यस्फोट पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी केला.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून यावेळीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे किमान दहा हजारांचे मताधिक्य मिळेल. कोल्हे हे घासून नव्हे तर ठासून विजयी होतील असा विश्वास कालच निकम यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केला होता. निकम हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार होेते. ते आंबेगाव तालुक्यातील असतानाही त्यांना त्यांच्या तालुक्यातूनही मताधिक्य मिळाले नव्हते. या वेळी मात्र अमोल कोल्हे यांना आंबेगावातून मताधिक्य मिळणार असल्याा दावा निकम यांनी केला होता. या घडामोडींवर गिरे यांनी तिरकस भाष्य केले.

यालाच अनुसरुन गिरे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले की, निकम म्हणजे राष्ट्रवादीच्या राजकारणाचा बळी असून हे त्यांनाही समजुन चुकलेले आहे. मुळात आंबेगावची सत्ता एका कुटुंबाभोवतीच एकवटल्याने आपले काहीच खरे नाही, हे त्यांना ठाऊक झालेले आहे. पर्यायाने एकीकडे राष्ट्रवादीचे कौतुक केल्यासारखे दाखवून आपल्या पोटातील राग कसा व्यक्त करायचा तो निकम यांनी खुबीने व्यक्त केला आहे.

मागील वेळी निकम हे आंबेगावचे असतानाही त्यांना आंबेगावमधून १८ हजारांची पिछाडी मिळाली होती. त्यावेळी वळसे पाटलांनी आपली मैत्री जपत खासदार आढळरावांसाठी निकम यांचा बळी दिल्याची चर्चाही शिवसैनिक खुबीने करतात. असे असताना यावेळी पुन्हा कोल्हे यांना १० हजारांचे मताधिक्य कसे मिळू शकते याचे कुठलेच गणित न मांडता निकम जेंव्हा कोल्हेंना १० हजारांची आघाडी मिळणार म्हणतात याचाच अर्थ मागील वेळी वळसे पाटलांनी निकम यांचा बळी दिला असा होतो, असा दावा गिरे यांनी केला. 

खासदार आढळराव यांच्याबाबतीत बोलताना निकम यांनी विमानतळ, वाहतूक कोंडी, पुणे-नाशिक रेल्वे, बैलगाडा शर्यती असेच मुद्दे पुन्हा उपस्थित केले होते. मात्र १५ वर्षांच्या काळात आढळराव वरील प्रश्नांना जबाबदार मग वळसे पाटलांनी वरील प्रश्नांच्या बाबतीत काय काम केले, याबाबत निकम काहीच बोलत नाहीत. म्हणजेच वळसे पाटील हेही वरील प्रश्नांच्या बाबतीत निष्क्रीय ठरलेत, असेही निकम यांना अप्रत्यक्ष सांगायचे आहे. हे समजायला कुणा पंडीताची गरज नाही. मुळात भीमाशंकर कारखान्याचा कारभार काढून घेवून निकम यांना राजकारणातून संपविण्याचे कट कोण रचतंय हे निकमांनाही ठाऊक आहे. त्यामुळे उगच उलटसुलट बोलून पोटातील गरळ गोड भाषेत व्यक्त करण्यापेक्षा आता त्यांनी थेट बोलण्याची वेळ आलेली आहे. ते वरील प्रमाणेच पुन्हा आणखी धाडसी वक्तव्ये करतील आणि आंबेगावच्या राजकारणात स्फोट करतील, अशी अपेक्षा आंबेगावकरांना असल्याचेही गिरे यांनी सांगितले.

भीमाशंकर आणि परागबद्दल ते नंतर बोलतीलच 
 भीमाशंकर साखर कारखाना उभा केला खासदार आढळराव यांनी. तो फायद्यात आणला निकम यांनी. मात्र भीमाशंकरच्या जिवावर पराग उभा करुन तो आपल्या नातेवाईकांना दिल्याची वस्तुस्थिती निकम लवकरच बोलतील. कारण भीमाशंकर कारखान्यावर ते प्रचंड प्रेम करतात आणि भिमाशंकरच्या बाबतीत कुठलाच अन्याय ते सहन करीत नाहीत. लवकरच ते `पराग`बद्दल बोलतील आणि कदाचित विधानसभेसाठी इच्छुक म्हणून पुढेही येतील, अशी शक्यताही गिरे यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com