शिवसेनेतून हकालपट्टीचा आशा बुचकेंना धक्का : अश्रू अनावर; रुग्णालयात दाखल

शिवसेनेतून हकालपट्टीचा आशा बुचकेंना धक्का : अश्रू अनावर; रुग्णालयात दाखल

पुणे : शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याचा जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना मानसिक धक्का बसला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यासाठी त्यांना जुन्नर येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत बुचके यांच्या हकालपट्टीची घोषणा आज करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या दबावामुळे ही कारवाई झाल्याचा आरोप बुचके यांनी केला. तसेच एक पराभव आढळरावांना पचविता न आल्याने त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केल्याची टीका त्यांनी केली.

ज्या खासदारांना सहाही मतदारसंघातुन नाकारण्यात आल तर माझ्यावरच कारवाई का, असा प्रश्न उपस्थित करुन माझा शिवसैनिकच आगामी विधानसभला उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अऩावर झाले.

शिवसेनेच्या कट्टर आणि आक्रमक कार्यकर्त्या म्हणून बुचके यांची ओळख आहे. पण त्यांचीच हकालपट्टी झाल्याने त्यांच्या समर्थकांनाही धक्का बसला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना त्यामुळे अनावर झाल्या. शिवसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोचले.  शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रसन्ना डोके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यजित शेरकर, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, पदाधिकारी गणेश कवडे, दिलीप गांजळे, जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांनी बुचके यांची भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com