anil shirole cautious about kakade`s wish | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

काकडेंच्या लोकसभेत जाण्याच्या इच्छेवर शिरोळेंची सावध भूमिका 

उमेश घोंगडे
रविवार, 2 सप्टेंबर 2018

पुणे : ``निवडणूक लढविण्याची इच्छा प्रत्येकाची असू शकते. त्यामुळे खासदार संजय काकडे यांनी इच्छा व्यक्त करण्यात गैर काही नाही. भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष असून या पक्षाचा मी निष्ठावान शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत पक्षाचा निर्णय अंतिम असेल. पक्ष जो निर्णय घेऊन तो निर्णय माझ्यासाठी शिरसावंद्य असेल, असे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले. "सरकारनामा'शी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा करताना भाजपाकडून आपणास निश्चित संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. या पार्श्‍वभूमीवर खासदार शिरोळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "" आमचा पक्ष हा शंभर टक्के लोकशाही व्यवस्थेवर विश्‍वास ठेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाकडे उमेदवारी कोणीही मागू शकते. मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असतो. माझ्यासाठी पक्ष सांगेल तेच अंतिम असेल.'' 

शिरोळे हे गेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वातीन लाख मतांची आघाडी घेऊन निवडून आले होते. भाजपाची विद्यार्थी आघाडी, पुणे महापालिकेत नगरेसवक, शहर भाजपाचे अध्यक्ष यासह विविध जबाबदाऱ्या त्यांनी गेल्या 40 वर्षात सांभाळल्या आहेत. खासदार झाल्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवरील पुण्याच्या महत्वपूर्ण प्रश्‍नांचा पाठपुरावा करून मार्गी लावण्यात गेल्या चार वर्षात शिरोळे यांना यश आले आहे. 

त्यांच्या उमेदवारीला २०१४ मध्ये पक्षातील काही नेत्यांनी विरोध केला होता. पालकमंत्री गिरीश बापट हे तेव्हा खासदारकीसाठी इच्छुक होते. तेव्हाही शिरोळे यांनी संयमाने परिस्थिती हाताळत उमेदवारी मिळवली. ती मिळाल्यानंतर स्वतः बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली होती. 

शिरोळेंना उमेदवारीसाठी आतापासूनच स्पर्धक तयार झाले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांचीही पुण्याच्या उमेदवारीबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट व्हायची आहे. पुण्याचा खासदार होण्याची त्यांची सुप्त इच्छा आहे. मात्र, या बाबत ते जाहीरपणे काहीच बोलत नाहीत. 
 
वाचा आधीच बातमी- खासदार काकडेंना तिकिटाचा विश्वास! अनिल शिरोळेंसाठी धोक्याची घंटा?

संबंधित लेख