खासदार काकडेंना तिकिटाचा विश्वास! अनिल शिरोळेंसाठी धोक्याची घंटा?

खासदार काकडेंना तिकिटाचा विश्वास! अनिल शिरोळेंसाठी धोक्याची घंटा?

पुणे : भाजपसाठी मी काम करत असल्याने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष मला पुण्यातून उमेदवारी नाकारणार नाही, असा दावा राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केल्याने पक्षातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट आणि विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना हा दावा रुचणार का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणूक कोणाला कमी दाखविण्यासाठी लढवायची नाही. पुण्यासाठी मी आजपर्यंत काम करीत आलो आहे. खासदार तर मी आताही आहेच. परंतु, लोकसभेचा खासदार झाल्यावर पुणेकरांचे प्रश्न व समस्या सोडवणे व त्यांच्या विकासासाठी काम करणे ही माझी नैतिक जबाबादारी बनते. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचेही काकडे यांनी सांगितले.

मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने प्रत्येक शनिवारी हॉटेल चर्चा आयोजित केली जातो. या कट्ट्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज खासदार संजय काकडे विशेष निमंत्रित होते. यावेळी ते बोलत होते. पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात व पुणे लोकसभा मतदार संघातून इच्छुक असल्याप्रकरणी खासदार संजय काकडे यांना उपस्थितांनी प्रश्न विचारले.

माझी राज्यसभेची खासदारकी 2020 पर्यंत आहे. शिवाय मागच्यावेळी पाठिंबा दिलेल्या 52 आमदारांपैकी किमान 50 आमदार पुन्हा निवडून येतील. त्यामुळे मी परत राज्यसभेवर जाऊ शकतो. पुण्यासाठी आजही काम करतोच आहे. पण त्याला काही मर्यादा पडतात. भाजपसाठी दीड लाख सदस्य नोंदणी, महापालिका निवडणुकीत पक्षासाठी केलेले काम आणि बहुजन चेहरा या गोष्टी पाहता आपल्याला डावलले जाणार नाही. भाजपकडून मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

काकडे यांच्या मताला होकार देत पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनीही चर्चेत रंगत आणली. पुण्यात काकडे हे भाजपकडून उमेदवार असतील तर, काँग्रेसला पुणे लोकसभा अवघड जाऊ शकते, असे मत त्यांनी चर्चेत व्यक्त केले. त्यांचे हे मत काकडेंच्या कौतुकापेक्षा काॅंग्रेसला खिजवण्यासाठी होते का, याचीही चर्चा नंतर सुरू झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com