Z.P. Member Naikwadi fights with leopard | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाईकवाडी यांची बिबट्याशी झुंज 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 16 मे 2017

उसात बसलेल्या बिबट्याने पाठीमागून झेप घेतल्यामुळे नाईकवाडी खाली पडले. बिबट्याने त्यांचे डोके जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला. डोक्‍याच्या मागच्या बाजूने दात खुपसले.

नाईकवाडी यांनी प्रसंगावधान राखून खांद्यावरून पुढे आलेले बिबट्याचे दोन्ही पाय पकडून डोक्‍यावरून उचलून पुढे आपटले. त्यामुळे बिबट्या आणखी चवताळला. त्याने समोरून हल्ला चढविला.

नगर: बिबट्याशी झुंज देणे म्हणजे जीवनाशीच खेळणे होय. ही वेळ आली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परबत नाईकवाडी यांच्यावर. अकोले तालुक्‍यात ही घटना घडली.

नाईकवाडी यांनी तब्बल दहा मिनिटे झुंज देऊन बिबट्याला पळवून लागले. जखमी अवस्थेत त्यांना आधी अकोल्याला व नंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अकोले तालुक्‍यातील गर्दनी येथील नाईकवाडी हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य. ते पिकाला पाणी पोचले की नाही, हे पाहण्यासाठी मंगळवारी घरापासून जवळ असलेल्या शेतात गेले.

उसात बसलेल्या बिबट्याने पाठीमागून झेप घेतल्यामुळे नाईकवाडी खाली पडले. बिबट्याने त्यांचे डोके जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला. डोक्‍याच्या मागच्या बाजूने दात खुपसले.

नाईकवाडी यांनी प्रसंगावधान राखून खांद्यावरून पुढे आलेले बिबट्याचे दोन्ही पाय पकडून डोक्‍यावरून उचलून पुढे आपटले. त्यामुळे बिबट्या आणखी चवताळला. त्याने समोरून हल्ला चढविला.

तेवढ्या अल्प काळातही सावरण्याचा प्रयत्न करत नाईकवाडी यांनी प्रतिकार केला. धावून आलेल्या बिबट्याच्या थेट बचळीत हात घालत त्यांनी सर्व शक्ती एकवटून पोटावर लाथेचा जोरदार प्रहार केला. बिबट्या सात-आठ फूट लांब जाऊन पडला. त्यात नाईकवाडी यांच्या डाव्या हाताच्या एका बोटाला गंभीर इजा झाली. 

या काळात नाईकवाडी यांच्या डोक्‍यातून रक्ताची धार लागली. हाताचे बोटही तुटल्यासारखे झाले. त्यामुळे त्यांना भोवळ आल्यासारखे वाटले. बिबट्या मात्र पुन्हा चाल करून येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून त्यांनी बसल्या जागेवरून एका हाताने त्याच्यावर माती फेकली. बिबट्या सात-आठ-फुटांवर थांबून राहिला. 

नाईकवाडी उठण्याचा प्रयत्न करू लागताच तो गुरगुरत पुढे येण्याचा प्रयत्न करी. बसल्या बसल्या मागे सरकत नाईकवाडी यांनी त्याच्यावर माती फेकणे सुरूच ठेवले. त्यांच्यातील अंतर वाढू लागले. मिनिटभरानंतर बिबट्या निघून गेला. 

नाईकवाडी कसेबसे उठून उभे राहिले आणि घराकडे निघाले. मात्र, डोक्‍यातून, बोटातून रक्तस्राव सुरू झाला होता. त्यांनी समोरच काही अंतरावर दिसणाऱ्या घरातील कुटुंबीयांना मोबाईलवरून माहिती दिली आणि सारे धावत आले.

नाईकवाडी यांना लगेच अकोल्यातील रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या डोक्‍याला बिबट्याच्या दातांमुळे मोठी जखम झाली होती. तिला 10-12 टाके पडले. दोन्ही हातांनाही मोठ्या जखमा झाल्या; छाती आणि पाठीला मार लागला आहे. प्रथमोपचारानंतर त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख