अभिनेत्री झायराच्या "एक्‍झिट'ने राजकीय वर्तुळात नव्या वादाची एन्ट्री...

अभिनेत्री झायराच्या "एक्‍झिट'ने राजकीय वर्तुळात नव्या वादाची एन्ट्री...

नवी दिल्ली : दंगल चित्रपटातील भूमिकेमुळे लोकप्रयतेच्या शिखरावर पोहचलेली काश्‍मिरी अभिनेत्री झायरा वसिम हिने बॉलिवूडमधून एक्‍झिट घेण्याची घोषणा केल्यानंतर नव्या चर्चेला तोंड फुटले असून, त्यात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे. झायराच्या एक्‍झिट हा राजकीय वर्तूळात चर्चेचा विषय ठरला आहे. काही राजकीय नेत्यांनी झायराच्या निर्णयाचा आदर करायला हवा, असे म्हटले आहे. मात्र, त्याच वेळी झायराच्या अशा घोषणेमुळे कडव्या, धर्मांधांना आयता विषय मिळाला आहे, अशी भूमिका काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मांडली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच चित्रपटसृष्टिशी संबंधित असलेल्या अनेकांनी याबाबत मतमतांतरे व्यक्त केली आहेत. 
राष्ट्रीय पारितोषिकावर नाव कोरलेल्या झायरा हिने अभिनयाच्या क्षेत्राला रामराम ठोकणार असल्याची घोषणा रविवारी केली होती. कामाच्या स्वरुपाबाबत असलेले असमाधान आणि त्याचा धर्मश्रद्धांमध्ये होत असलेल्या हस्तक्षेपामूळे आपण चंदेरी दुनियेतून एक्‍झिट घेत आहोत, असे झायराने म्हटले होते. झायराच्या या घोषणेनंतर जम्मू आणि काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर उब्दुल्ला यांनी ट्विट करत झायराचे समर्थन केले होते. आयुष्य कसे जगायचे याचा निर्णय घेण्याचा झायराला पूर्ण अधिकार असून, तिच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करायला हवा, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्ला यांच्या पाठोपाठ आता या विषयात कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला, मिलिंद देवरा, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही मतप्रदर्शन केले आहे. 
मान्यवरांनी केलेले ट्‌विट 
कलाकाराच्या व्यक्त होण्याशी धर्माचा संबंध नसतो. मात्र, झायराने दिलेल्या कारणामुळे दोन्ही बाजूंच्या धर्मांध, कट्टरवाद्यांना फुकटचे खाद्य पुरविले जाते. 
- रणदीपसिंह सुरजेवाला, कॉंग्रेसचे प्रवक्ते 
करियरच्या निवडीमध्ये धर्माचा अडसर असता कामा नये, तो निर्णय सर्वस्वी तुमचाच हवा. 
- मिलिंद देवरा, कॉंग्रेसचे नेते 
धर्मानुसार आचरणाचा सर्वांना अधिकार आहे. मात्र, करियरच्या निवडीमध्ये धर्माचा हस्तक्षेप नको. झाहिराच्याच धर्माचे अनुसरण करणारे अनेक जण हिंदी चित्रपटसृष्टित यशस्वी ठरले आहेत. मग हे या अभिनेत्यांना आपला धर्म समजला नाही असे म्हणायचे का? 
- प्रियांका चतुर्वेदी, शिवसेनेचे नेत्या 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com