Zafaryab Jilani on Ayodya verdict | Sarkarnama

अयोध्या प्रकरण : निकालाबाबत आदर; मात्र समाधानी नाही - जिलानी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो. मात्र या निकालाबाबत `समाधानी नसल्या'चे सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील झफरयाब जिलानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो. मात्र या निकालाबाबत `समाधानी नसल्या'चे सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील झफरयाब जिलानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिलानी म्हणाले, की न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर करतो. परंतु या निकालाबाबत आम्ही समाधानी नाही. या निकालाबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात चर्चा करून `रिव्ह्यू` दाखल करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. 

न्यायालयाने निकालात नोंदवलेल्या काही निरिक्षणामुळे देशातील सामाजिक सौहार्द वाढण्यास फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख