दाक्षिणात्य पेहरावावरुन आदित्य ठाकरे ट्रोल; हटाव लुंगी...बजाव पुंगीची नेटकऱ्यांकडून आठवण

अमराठी भाषेत होर्डिंग लावल्यामुळे ट्रोल झालेले शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा नेटकऱ्यांना खाद्य दिले आहे. दाक्षित्य पेहरावात प्रचार करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना नेटकऱ्यांनी 'हटाव लूंगी बजाव पुंगी'ची आठवण करुन दिली आहे.
Netizens Trolling Aditya Thakrey Over South Indian Costume
Netizens Trolling Aditya Thakrey Over South Indian Costume

मुंबई : अमराठी भाषेत होर्डिंग लावल्यामुळे ट्रोल झालेले शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा नेटकऱ्यांना खाद्य दिले आहे. दाक्षित्य पेहरावात प्रचार करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना नेटकऱ्यांनी 'हटाव लूंगी बजाव पुंगी'ची आठवण करुन दिली आहे.

वरळीतून आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर या परिसरात गुजरातीसह अनेक अमराठी भाषेतील होर्डिंग लावण्यात आले. त्यात 'केम छो वरळी' या गुजराती भाषेतील होर्डिंगवर तर प्रचंड टिका झाली होती. या टिके मुळे होर्डिंग हटवण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सोमवारी वरळीतील प्रचारात आदित्य ठाकरे यांनी लुंगी आणि पांढरा शर्ट असा दाक्षिणात्य पेहराव परीधान केला होता. त्यावरुनही समाजमाध्यमांवर आदित्य यांना पुन्हा ट्रोल केले जात आहे.

शिवसेनापक्ष प्रमुख दिवंगत  बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती दाक्षिणात्यांच्या विरोधात. 'हटाव लूंगी बजाव पुंगी' ही शिवसेनेची घोषणा प्रचंड गाजली होती. त्यांनतर उत्तर भारती, गुजराती यांना विरोध करत शिवसेना वाढत गेली. त्यामुळे आदित्य यांचे होर्डिंग आणि पेहराव ट्रोलिंगचा मुद्द बनत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com