हेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स

हेल्थकेअर प्रोफेशनल्स मध्ये करिअर करणाऱ्यांसाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने स्मार्ट अकॅडमीच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे.
Tech Mahindra Foundation Career oportunities in healthcare sector
Tech Mahindra Foundation Career oportunities in healthcare sector

मुंबई : हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने Tech Mahindra Foundation विविध कोर्स विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहेत. यामध्ये सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स ते 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्सही आहे. महिंद्रा ग्रुपच्या टेक महिंद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून स्मार्ट अकॅडमी फॉर हेल्थकेअरमध्ये हे सर्व कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (Tech Mahindra Foundation Career oportunities in healthcare sector)

2007 मध्ये टेक महिंद्रा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून अशाच प्रकारच्या प्रकल्पांसाठी टेक महिंद्रा फाउंडेशन काम करत आहे. शिक्षणासह रोजगाराच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. तसेच दिव्यांगांना सक्षम करण्याचं आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी कंपनी सातत्यानं प्रयत्नशील आहे. देशात 90 हून अधिक पार्टनर्ससोबत मिळून 11 ठिकाणी 150 पेक्षा जास्त सामाजिक प्रकल्पांवर काम सुरू करण्यात आलं आहे. 

टेक महिंद्राचं भारतातलं मुख्य कार्यालय हे दिल्लीत असून याशिवाय 11 प्रादेशिक कार्यालये आहेत. यामाध्यमातून जवळपास 5 लाखांहून जास्त लाभार्थी असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. शिक्षण आणि रोजगार या दोन क्षेत्रात 150 प्रकल्प सुरु असल्याचंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं. तसंच यामध्ये महिलांना समान संधी देण्यात येत असून दिव्यांगांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 

हेल्थकेअर प्रोफेशनल्स मध्ये करिअर करणाऱ्यांसाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने स्मार्ट अकॅडमीच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये विविध डिप्लोमा कोर्स असून त्यांचा कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतचा आहे.

सर्टिफिकेट कोर्स

हॉस्पिटल फ्रंट ऑफिस अँड बिलिंग एक्झिक्युटीव्ह, जनरल ड्युटी असिस्टंट, होम हेल्थ एड यासाठी सहा महिन्यांचा प्रमाणपत्र कोर्स आहे. तसेच नर्सिंग केअर, ऑप्थॅलमिक टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन हे प्रमाणपत्र कोर्सेस एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करता येतील.

डिप्लोमा कोर्स

डिप्लोमा कोर्समध्ये डायलिसिस टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी या कोर्सेसचा समावेश आहे. डिप्लोमा कोर्सचा कालावधी दोन वर्षांचा आहे.

संस्थेची वैशिष्ठ्ये

टेक महिंद्रा स्मार्ट अकॅडमी फॉर हेल्थकेअरच्या माध्यमातून पॅरामेडिकल डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जात आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय इतर कौशल्यांचा विकास व्हावा यादृष्टीनेही संस्था काम करत आहे. विद्यार्थ्यांना सुसज्ज आणि अद्ययावत लॅब उपलब्ध आहेत. कंपनीच्या सल्लागार आणि व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ आणि अनुभवींचा समावेश असून विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधाही आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही पुरवली जाते. नामवंत आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप आणि नोकरीची संधीही उपलब्ध करून दिली जाते.

संस्थेत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवल्या जातात. तसंच प्लेसमेंट असिस्टन्सची सुविधा दिली जाते. सर्व अकॅडमीमध्ये प्लेसमेंट रेट 75 टक्क्यांहून जास्त असून भारतातील जवळपास 70 रुग्णालये प्लेसमेंटच्या प्रक्रियेत सहभागी होतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com