#SCForSSR : कंगना म्हणाली, "आम्हाला खरं जाणून घेण्याचा अधिकार आहे..."  - #SCForSSR: Kangana says, "We have a right to know the truth ..." | Politics Marathi News - Sarkarnama

#SCForSSR : कंगना म्हणाली, "आम्हाला खरं जाणून घेण्याचा अधिकार आहे..." 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी अभिनेत्री कंगना राणावत हीने केली आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येला आता दोन महिने पूर्ण होणार आहेत. मात्र, अद्यापही सुशांतच्या आत्महत्येचे कारण समजलेलं नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून राजकारण सुरू आहे. सुशांतसिंहला न्याय मिळावा, यासाठी अनेकांनी मोहिम राबविली आहे. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी अभिनेत्री कंगना राणावत हीने केली आहे. याबाबत कंगना राणावत हीने टि्वटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चैाकशी व्हावी, आम्हाला खरं जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे म्हटलं आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

सुशांतच्या मृत्यूवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात आता राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी उडी मारली आहे. मेमन यांनी या प्रकरणी ट्विटरवर भूमिका मांडली असून, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माध्यमांमध्ये जेवढी जागा मिळत नाही, तेवढी सुशांतला मिळत आहे, असे म्हटले आहे. सुशांत जिवंत असताना जेवढा प्रसिद्ध नव्हता तेवढा तो मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

सुशांतच्या मृत्यूवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात आता राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी उडी मारली आहे. मेमन यांनी या प्रकरणी ट्विटरवर भूमिका मांडली असून, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माध्यमांमध्ये जेवढी जागा मिळत नाही, तेवढी सुशांतला मिळत आहे, असे म्हटले आहे. सुशांत जिवंत असताना जेवढा प्रसिद्ध नव्हता तेवढा तो मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी खासदार माजिद मेमन यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख