Sakal Edu Expo : मुलांच्या करिअरला द्या योग्य दिशा

येत्या १० ते १२ ऑगस्टदरम्यान हा मार्गदर्शन मेळावा होणार आहे.
Sakal Edu Expo stars from tomorrow
Sakal Edu Expo stars from tomorrow

पुणे : घरात बसून लॅपटॉप, संगणक किंवा मोबाईलच्या साहाय्याने आपल्या दहावी-बारावी झालेल्या मुला-मुलींसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने या ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केलं आहे. प्रवेश नेमका कुठे घ्यायचा, मुलांनी निवडलेल्या करिअरच्या मार्गावर जाण्यासाठी योग्य दिशा कोणती, याबाबत ‘सकाळ एज्यु एक्स्पो : २०२१’च्या व्यासपीठावरून मार्गदर्शन मिळेल. (Sakal Edu Expo stars from tomorrow)

प्रवेश प्रक्रिया, करिअरच्या वेगवेगळ्या संधी याबाबत सर्व माहिती, तसेच विद्यार्थी-पालकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी येत्या १० ते १२ ऑगस्टदरम्यान हा मार्गदर्शन मेळावा होणार आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी हे या मेळाव्याचे प्रमुख प्रायोजक आहेत. विद्यार्थी, पालक आणि देशातील नामांकित शैक्षणिक संस्था यांना व्हर्च्युअली जोडण्यासाठी हे व्यासपीठ महत्वाचे ठरणार आहे. 

दहावी, बारावीनंतर चांगले करिअर करण्यासाठी नेमका प्रवेश कुठे आणि कसा घ्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांसमोरही असतो. यांसह शिक्षण, करिअरशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना आणि पालकांना या मेळाव्यात मिळतील. हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थी-पालकांना घरात बसूनच यात सहभागी होता येईल. मेळाव्यातील ‘लाइव्ह वेबिनार’द्वारे विद्यार्थ्यांना विविध कोर्ससाठी सहभागी होता येईल. 

मेळाव्याद्वारे देशातील २५ नामांकित आणि अग्रगण्य अशा विद्यापीठांसमवेत जोडणे शक्य होणार आहे. यामध्ये एमआयटी-एडीटीयू, एनएमआयएमएस, एआयएसएसएमएस, अमृता विश्व विद्यापीठम्‌, टेक महेंद्रा फाउंडेशन, कनव्हे डॉट इन आणि ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबई, ॲस्ट्युट ॲकॅडमी (फॉरेन लॅग्वेज टीचिंग ॲण्ड करिअर कौन्सिलर), शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स विंग्ज कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी या विद्यापीठ आणि नामांकित संस्थांचा समावेश आहे.

मेळाव्याविषयी आधिक माहिती :
कालावधी : १० ते १२ ऑगस्ट
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com