महाराष्ट्रातला सर्वात मोठा Edu Expo: मोफत नोंदणीसाठी येथे क्लिक करा

‘सकाळ एज्यु एक्स्पो 2021' हे विद्यार्थी आणि भारतातील उत्तमोत्तम महाविद्यालये यांना जोडणारे एक व्हर्च्युअल व्यासपीठ आहे.
महाराष्ट्रातला सर्वात मोठा Edu Expo: मोफत नोंदणीसाठी येथे क्लिक करा
Largest Education Expo in Maharashtra registration started

कोरोनामुळे मागील दीड वर्षाहून अधिक काळ सर्व ठप्प झाले आहे. शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. शाळा ऑनलाइन सुरु असून यंदा दहावी, बारावीच्या परीक्षासुद्धा रद्द कराव्या लागल्या. आता निकाल लागल्यानंतर कुठे प्रवेश घ्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व शकांचे निरसन करण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सकाळ माध्यम समूह मदत करणार आहे. (Largest Education Expo in Maharashtra registration started)

सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक आणि आर्थिक क्षमता बळकट करण्यासाठी या मेळाव्यात 'मास्टर प्लान' आहे. ‘सकाळ एज्यु एक्स्पो 2021' हे विद्यार्थी आणि भारतातील उत्तमोत्तम महाविद्यालये यांना जोडणारे एक व्हर्च्युअल व्यासपीठ आहे. 

शैक्षणिक समुपदेशानासाठी 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत 'सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021' होणार आहे. बारावीनंतर करिअर ओरिएंटेड शॉर्ट टर्म कोर्स करू इच्छिणाऱ्यांना एक संधी सकाळ माध्यम समुहाने निर्माण केली आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 च्या माध्यमातून असंख्य असे करिअर ओरिएंटेड कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील. 

लाइव्ह वेबिनारद्वारे एक्स्पोमध्ये विविध कोर्ससाठी सहभागी होता येईल. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 मधून भारतातील 50 नामवंत आणि अग्रगण्य अशा विद्यापीठांसोबत जोडले जाणार आहेत. यामध्ये MIT-ADTU, NMIMS, AISSMS, Amrita Vishwa VidyaPeetham, Tech Mahindra Foundation, Convey.in आणि Amity University Mumbai या विद्यापीठ आणि नामांकित संस्थांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाच्या शिक्षण तज्ज्ञांशी थेट संपर्क साधता येईल. तसंच कोर्सेसद्वारे कॉलेजकडून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीचा त्वरीत लाभ मिळणार आहे. करीअर घडविणाऱ्या योग्य कोर्ससाठी आजच आपले नाव नोंदवा. यासोबत तुम्हाला स्टॉक मार्केट प्रशिक्षण (हिंदी भाषेत) आणि मुलभूत (बेसिक) स्टॉक मार्केट हे दोन कोर्स विनाशुल्क करता येतील. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 मध्ये मोफत नोंदणीसाठी www.sakalexpo.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in