महाराष्ट्र सायबर विभागात इंटर्नशिपची सुवर्ण संधी - Internship Opportunity in Maharashtra Cyber Cell | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्र सायबर विभागात इंटर्नशिपची सुवर्ण संधी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने पात्र उमेदवारांकडून आंतरवासितेसाठी (इंटर्नशिप) अर्ज मागविले आहेत.

मुंबई  : महाराष्ट्र सायबर विभाग पात्र उमेदवारांकडून आंतरवासितेसाठी (इंटर्नशिप) अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in या ई-मेलवर अथवा स्पीड पोस्टद्वारे १२ ऑगस्टपर्यंत पाठवावा. हा बायोडाटा विशेष पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, ३२ वा मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- ४००००५ या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आंतरवासितेसाठी उमेदवारास संगणकीय तांत्रिक ज्ञान असावे. त्याचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. संभाषण व लेखन कौशल्य असावे. आंतरवासितेचा कालावधी ६ महिन्यांचा असेल. विहित कालावधी संपेपर्यंत उमेदवाराला आंतरवासिता सोडता येणार नाही. (अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्‍यक) महाराष्ट्र सायबरकडून उमेदवारास कोणताही भत्ता, प्रवास भत्ता देण्यात येणार नाही, असे कळवण्यात आले आहे.

महाराष्ट्र सायबरच्या कार्यालयात उमेदवारास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे लागेल. महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयांसाठीचे गोपनियतेसंदर्भातील सर्व नियम व कायदे यांचे पालन उमेदवारास कसोशीने करावे लागेल. कार्यालयीन कोणतेही विषय/माहिती यांचा गैरवापर करणे, फेरफार करणे, ताब्यात घेणे असे गैरप्रकार उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाहीत,  असे महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख