काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील कोरोना पाॅझिटिव्ह - Congress MLA Rituraj Patil infected with corona   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

कोरोना विरोधातील या लढाईत चुलते सतेज पाटील यांच्यासह प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ऋतुराज काम करत होते.

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना विरोधातील लढ्यात आघाडीवर असलेले कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाची लागण झाली. पाटील यांनी स्वतः याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ऋतुराज हे पुतणे आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून ते कॉंग्रेसच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले. जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. एप्रिल ते जून दरम्यान याची तीव्रता कमी होती पण त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा समुह संसर्ग झाल्याने बाधितांबरोबरच कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्याही वाढली.

कोरोना विरोधातील या लढाईत चुलते सतेज पाटील यांच्यासह प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ऋतुराज काम करत होते. केवळ कोल्हापूर दक्षिण मतदार संघावरच लक्ष केंद्रीत न करता शहरातील कसबा बावडा परिसरातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्‍यक उपयायोजना करण्यात ते आघाडीवर होते.

हे सर्व करत असताना आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही याची पुरेपुर खबरदारीही त्यांनी घेतली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून प्रकृत्तीचा किरकोळ त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आपली कोरोनाची तपासणी करून घेतली, त्यात त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला. आज सकाळी पाटील यांनी ही माहिती ट्‌विटद्वारे दिली. त्यांच्यावर टाकाळा परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आपली तब्बेत उत्तम असल्याची माहितीही त्यांनी ट्‌विटमध्ये दिली आहे.

कोरोना रूग्णांकडून शंभर रूपये जास्त घेतलं तर रूग्णालयाकडून पाचशे रूपये वसूल करा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. रूग्णालयांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा,  डॅाक्टरांचा आदर करा. आता लॉकडाउन विषय थांबवला आहे. आता अनलॉक करूया. आपल्याला कोरोना सोबत काही महिने जगावे लागेल. सर्व अटी नियम पाळून पुण्यात गणेशोत्सव आनंदाने साजरा करा, असं राजेश टोपे यांनी आज पुण्यात सांगितलं.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख