सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे.. - CBI to probe Sushant Singh case | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेला गुन्हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. बिहार सरकारला तपासाला अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे.

या प्रकरणाचं सर्व पुरावे महाराष्ट्र सरकारने सीबीआयला द्यावे, आदेशाचं पालनं करावं, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेला गुन्हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. बिहार सरकारला तपासाला अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. 

आमदार बबलू यांनी या प्रकरणातील साक्षीदारांची हत्या होऊ शकते, असा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील साक्षीदारांना धमकावण्यात येत आहे. त्यांची हत्या केली जाऊ शकते. मुंबई पोलीस मात्र, या साक्षीदारांना संरक्षण पुरवत नाहीत. ज्या प्रकारे सर्व घडामोडी घडत आहेत त्या पाहता साक्षीदारांची हत्या होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी साक्षीदारांना संरक्षण पुरवावे अशी आमची मागणी आहे. 

सुशांतची बहीण श्वेतासिंह किर्ती यांनी सीबीआय चौकशीसाठी मोहीम सुरू केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी देशभरातील सर्वांनी करावी. आम्हाला या प्रकरणातून दुसरे काही नको आहे. केवळ सत्य बाहेर यावे अशी आमची इच्छा आहे.

सुशांतला न्याय मिळायला हवा. यामुळे या प्रकरणी सर्वांनीच सीबीआय चौकशीसाठी एकत्र येऊन मागणी करावी. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. 

अभिनेता सुशांतसिंग आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्तीने आपली अधिकृत बाजू वकिलांच्या माध्यमातून मांडली आहे. त्यात शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा आपला काहीही संबंध नसून, त्यांना कधीही भेटलेली नाही. त्यांच्याशी कधीही फोनवरून बोलणे झालेले नाही. केवळ ते शिवसेनेचे नेते आहे. इतकीच माहिती असल्याचे म्हटले आहे. रियाच्या वतीने तिचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी हे  स्टेटमेंट जारी करण्यात केले आहे.

आपल्या स्टेटमेंटमध्ये रियाने काही खुलासे केले असून, त्यात आदित्य ठाकरे यांच्याशी आजपर्यंत कधी भेट झाली नसल्याचा दावा तिने केला आहे. अभिनेता डिनो मोर्या यांना आपण ओळखत असून, ते चित्रपटसृष्टीमध्ये वरिष्ठ अभिनेता आहेत. तसेच आपण सक्तवसुली संचनालय (ईडी) व मुंबई पोलिस दोघांनाही तपासात पूर्णपणे सहकार्य करत असल्याचेही रियाने म्हटले आहे. 
Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख