संधी करिअरच्या : वाणिज्य शाखा निवडताना

वाणिज्य शाखेच्या एकाही विषयाची दहावीपर्यंत तोंडओळखही नसल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेताना विद्यार्थी गोंधळलेले असतात.
Career Opportunities in Commerce after 10th
Career Opportunities in Commerce after 10th

दहावीनंतर विद्यार्थ्यांना शास्त्र, वाणिज्य व कला यांपैकी एका शाखेची निवड करून आपल्या भविष्याची पायाभरणी करावी लागते. आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीत असलेला अंगभूत दोष म्हणजे, दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शास्त्र शाखेच्या (गणित आणि विज्ञान विषयांमुळे) आणि कला शाखेच्या (भाषा, इतिहास, भूगोल) विषयांची नीट ओळख असते, त्यामुळे अकरावीत शास्त्र किंवा कला शाखा घ्यावी की नाही याचा त्यांना अंदाज बांधता येतो. (Career Opportunities in Commerce after 10th)

मात्र, वाणिज्य शाखेच्या एकाही विषयाची दहावीपर्यंत तोंडओळखही नसल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेताना विद्यार्थी गोंधळलेले असतात, आणि मग बहुतेक वेळा शास्त्र शाखेला जाण्याची इच्छा नाही म्हणून विद्यार्थी वाणिज्य शाखेचा पर्याय निवडतात. खरे तर वाणिज्य शाखेचा एकही विषय माहितीचा नाही, ही एका अर्थाने इष्टोपत्ती ठरते. कारण, त्यामुळे विद्यार्थी वाणिज्य शाखेचे विषय अभ्यासताना पूर्वग्रहमुक्त असतात. सगळ्याच विद्यार्थ्यांना नव्याने सुरुवात करावी लागते आणि त्यामुळे दहावीपर्यंत विज्ञान, भाषा, गणित, इतिहास/भूगोल हे विषय आवडत वा झेपत नाहीत व त्यामुळे शाळेत फार चमकत नाहीत असे विद्यार्थी वाणिज्य विद्याशाखेत उत्तम प्रगती करू शकतात.

वाणिज्य विद्याशाखेतून उत्तम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर सीए, सीएस, सीएमए यासारख्या प्रोफेशनल कोर्सेस व्यतिरिक्त बीबीए /बीबीएम/ बीसीए, मास कम्युनिकेशन, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, अर्थशास्त्र या शाखांमध्ये पुढील शिक्षण घेता येते, तर पदवीनंतर एमबीए, लॉ, स्पर्धा परीक्षा, बॅंकिंग, इन्शुरन्स, टॅक्सेशन, मास कम्युनिकेशन अशा विविध क्षेत्रात करिअर करता येते.

अकरावी हे खरे तर वाणिज्य विद्याशाखेचे पायाभूत वर्ष असते. अकरावीचे गुण पुढे कधीच विचारात घेतले जात नसल्याने विद्यार्थी अकरावीचे वर्ष ‘रेस्ट इयर’ समजतात. या वर्षांचा वापर अत्यंत उत्तम रितीने करता येऊ शकतो. वाणिज्य शाखेतून उत्तम करिअर घडण्यासाठी रावीच्या वर्षी खालील गोष्टी करणे फायद्याचे ठरते.

शैक्षणिक कौशल्ये (वाचनाचा वेग, लिखाणाचा वेग, स्मरणशक्ती, अवांतर वाचन) विकसित करण्यावर भर द्यावा. ही सर्व कौशल्ये कशी शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित करता येतील हे पाहावे.

  • लिखित व मौखिक दोन्ही पद्धतीने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावे.
  • कॉम्प्युटरचा बेसिक कोर्स पहिल्या टर्ममध्ये, तर टॅली पॅकेज दुसऱ्या टर्ममध्ये शिकून घ्यावे.
  • अकाऊंटन्सी व इकॉनॉमिक्स या विषयांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, यातील ज्या विषयात जास्त रुची निर्माण होईल त्या विषयावर आधारित बारावीनंतर करिअरचा मार्ग निवडता येतो.
  • सी.ए. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या दुसऱ्या टर्मपासूनच सी.ए. फाऊंडेशन परीक्षेची तयारी सुरू करावी.
  • सी. ए. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावी, बारावीला गणित विषय घेणे फायद्याचे ठरते.
  • सी. एस. किंवा लॉ करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावी, बारावीला सेक्रेटरीयल प्रॅक्टिस विषय घेणे फायद्याचे ठरते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com