आदित्य ठाकरे ब्राव्हो.. नेटिझन्सच्या प्रतिक्रिया..  - Aditya Thackeray Bravo .. Netizens' reaction .. | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरे ब्राव्हो.. नेटिझन्सच्या प्रतिक्रिया.. 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 ऑगस्ट 2020

"माझे वडिल अत्यवस्थ आहेत.... त्यांना उपचारांसाठी पुण्यात आयसीयुची गरज आहे, " असे टि्वट केलं होतं.

पुणे : " माझ्या वडिलांना आयसीयुची गरज आहे," असे टि्वट पुण्यातील एका युवतीनं केलं. अन् प्रशासकीय यंत्रणा हलली. तिच्या वडिलांवर उपचार सुरू झाले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या मदतीचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला. सरकारमधील आदित्य ठाकरेसारखे मंत्री अशा प्रकारे मदत करीत असतील, तर नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, अशा भावना नेटिझन्सने व्यक्त केल्या आहेत.   

पु्ण्यातील ऐश्वया पारेख हीने काल मध्यरात्री "माझे वडिल अत्यवस्थ आहेत.... त्यांना उपचारांसाठी पुण्यात आयसीयुची गरज आहे, " असे टि्वट केलं होतं. हे टि्वट तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यालय आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग केलं होतं. यांची दखल आदित्य ठाकरे यांनी घेतली. 

ऐश्वया पारेख यांच्या टि्वटला आदित्य ठाकरे यांनी लगेच रिप्लाय केला. आदित्य यांनी तिला आपला मोबाइल क्रमांक देण्यास सांगितले. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी आदित्य ठाकरे यांनी संपर्क साधला. ऐश्वया पारेख हिच्या वडिलांना उपचारासाठी दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनंतर पुणे महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. तिच्या वडिलांवर उपचार सुरू झाले. ऐश्वया हिने उपचाराबाबतची माहिती ठाकरे यांना कळविली.

आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयाकडूनही याबाबत वेळोवेळी संपर्क साधण्यात येत होता. या मदतीबाबत ऐश्वया हीने आदित्य ठाकरे यांच्या टिमचे आभार मानले आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. आदित्य ठाकरे यांच्या यापूर्वीही अशाच प्रकारची मदत केल्याची माहिती नेटिझन्सने दिली. या मदतीचा ट्रेंड टि्वटवर व्हायरल झाला. काही तासातच अनेक नेटकऱ्यांनी यावर आपली मते नोंदवली. काहीनी ते टि्वट लाईक केले. "आदित्य ठाकरे ब्राव्हो.. "   "राज्य सरकारमधील मंत्री अशा प्रकारे काम करीत असतील तर, नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल,..." .अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत होत्या.
Edited  by : Mangesh Mahale   

हेही वाचा : सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण सुरू...  

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण करू नका, मुंबई पोलिस तपास करण्यास सक्षम आहे, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ज्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, त्यांच्या हेतुबदल शंका वाटते, असेही संजय राऊत यांनी सांगितले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सुरू असलेला तपासाबाबत अनेक प्रश्नांना राऊत यांनी उत्तरे दिली. संजय राऊत म्हणाले, "पडद्यामागून कोण हालचाली करीत आहेत, कोण पटकथा लिहित आहे, हे लवकरच समजेल. कुणाचे हात किती दगडाखाली आहे, हे आम्हाला माहित आहे. लवकरच काही प्रकरणाचा तपास सुरू होणार आहे. त्यामुळे या मागे कोण आहे, हे लवकरच कळेल."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख