राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांचा सत्यजित तांबेंना असाही सल्ला - suraj chavan advices satyajeet tambe to learn from past | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांचा सत्यजित तांबेंना असाही सल्ला

महेश जगताप
गुरुवार, 16 जुलै 2020

तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात त्याचा भूतकाळ जाणून घ्या. माहिती घेण्याआधी सार्वजनिक मत व्यक्त करणे चुकीचे आहे, असे शाब्दिक  फटकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकारी अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी  सत्यजित तांबे यांना मारले आहेत.

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या विकासाकरता सत्तेवर आलेले आहे .दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही महा जॉब योजनेद्वारे राज्यातील युवकांना रोजगार देण्याचं काम करणार आहोत. याबाबतच्या जाहिरातीत संबंधित खात्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याचे फोटो टाकण्यात आले आहेत. यात नाराज होण्यासारखे काय ? तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात त्याचा भूतकाळ जाणून घ्या. माहिती घेण्याआधी सार्वजनिक मत व्यक्त करणे चुकीचे आहे, असे शाब्दिक  फटकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकारी अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी  सत्यजित तांबे यांना मारले आहेत .

आज  तांबे यांनी ट्विट करताना महा जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ? 
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही  हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. अशी खंत व्यक्त केली होती .त्याला उत्तर देताना चव्हाण यांनी तांबे यांना उत्तर दिले.

सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी शरद पवार यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे .या सरकारच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या वाटेवर आपणाला जायचे आहे . शिष्टाचारानुसार त्या जाहिरातीमध्ये फोटो टाकण्यात आले आहेत. त्यामुळे तांबे यांनी योग्य माहिती घेयला पाहिजे होती .हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्राम या ही योजना घेऊन अस्तित्वात आलेले आहे .हे सरकार विकासाच्या वाटेवर जात असताना अशी टीका तांबे यांनी करणे चुकीचे आहे. यापुढे बोलताना त्यांनी माहिती घेऊन बोलावे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली .

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख