राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या नऊ पदाधिकारी जाहीर - presiden for nine district announced by ncp lady youth wing | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या नऊ पदाधिकारी जाहीर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

नव्या पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ नेत्यांच्या शुभेच्छा

मुंबई : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड आज जाहीर करण्यात आली आहे.

यात सांगली महानगर अध्यक्षपदी अमृता तानाजी चोपडे, सातारा जिल्हाध्यक्षपदी पूजा संतोष काळे, सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी सुजाता विनायक भोसले,  रायगड जिल्हाध्यक्ष पदी अॅड. सायली दळवी, रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी दिशा दशरथ दाभोळकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी मिता प्रल्हाद परब,  ठाणे जिल्हाध्यक्ष पल्लवी शिवा जगताप,  पनवेल जिल्हाध्यक्ष पदी प्रज्ञा सागर चव्हाण आणि नवी मुंबई निरीक्षक पदी प्रियांका  सोनार यांची निवड घोषित आली आहे.

 

No photo description available.

 

पक्ष बळकटीसाठी व अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी यापुढेही असेच निष्ठेने कार्य करत राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने या नियुक्त्या जाहीर केल्याचे सांगण्यात आले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख