राज ठाकरेंची नजर चुकवून मनसे विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष शिवसेनेत

दोन्ही पक्षांत आता पुण्यात आवक-जावक वाढण्याची चिन्हे
Kalpesh yadav
Kalpesh yadav

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे हे दर शुक्रवारी पुण्यात येऊन येथील संघटना मजबूत करण्यासाठी पुन्हा कार्यरत झाले असतानाच शिवसेनेने पुण्यात मनसेचा मोहरा फोडला आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सध्या दोन्ही पक्षांत एकमेकांचे नेते, कार्यकर्ते घेण्याचे काम सुरू आहे. त्यातून मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. (Kalpesh Yadav joins Shivsena)

आदीत्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी हा प्रवेश झाला. वरुण सरदेसाई यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मनसेचे आदित्य शिरोडकर हे नुकतेच सेनेत आले होते. त्यानंतर सेनेने आता पुण्यातील मनसेकडे नजरा वळविल्या आहेत. 

विद्यार्थी सेनेत काम करत असताना शासन स्थरावर योग्य तो पाठपुरावा होणं गरजेचं आहे. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आदीत्य यांनी दिले असल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याचे यादव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नव्हते. पदभरती अजून बाकी आहे. या प्रश्नांवरही सेनेत काम करणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी पुण्यात लक्ष केंद्रीत केलेेले असतानाच तेथेच मनसेला डिवचण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे आणखी काही मनसेतून आऊटगोईंग सेनेत होणार का, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com