राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे यांची नियुक्ती

या पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्याने नावाबद्दल उत्सुकता होती.
राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे यांची नियुक्ती
sunil-gavhane

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुनील विजय गव्हाणे यांची तर उपाध्यक्षपदी आणि पश्चिम महाराष्ट्रच्या विभाग प्रमुखपदी सुहास विजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विभागवार प्रमुख म्हणून नियुक्त्या
पुणे विभाग - संध्या उद्धव सोनावणे
कोकण विभाग - किरण गोरखनाथ शिखरे
मराठवाडा विभाग - प्रशांत कैलाश कदम
अमरावती विभाग - अविनाश सत्येंद्रनाथ चव्हाण
नाशिक विभाग - चिन्मय अविनाश गाढे
नागपुर विभाग - आशिष प्रकाश आवळे
आयटी विभाग - जितेश सुरेश सरडे

या पदांसाठी निवडी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तसेच पक्षात घराणेशाहीतील नावांना पसंती मिळणार की इतरांना संधी मिळणार, याचीही उत्सुकता होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड येथील गव्हाणे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्या आधी ते विद्यार्थी शाखेेचे पिंपरी-चिंचवड येथील अध्यक्ष होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in