yuvak kranti dal appointments | Sarkarnama

'युक्रांद'च्या पुणे शहराध्यक्षपदी सचिन पांडुळे  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 जुलै 2019

डॉ. प्रविण सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली आज गांधी भवन (कोथरूड) येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

पुणे: युवक क्रांती दलाच्या पुणे शहराध्यक्षपदी सचिन पांडुळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. प्रविण सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली आज गांधी भवन (कोथरूड) येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, रवी लाटे उपस्थित होते.

युवक क्रांती दलाच्या पुणे शहराच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सचिन पांडुळे  (अध्यक्ष पुणे शहर),सुदर्शन चखाले (सेक्रेटरी पुणे शहर), ऋतुजा पुकाळे ( संघटक ,पुणे शहर), प्रसन्न मराठे ( उपाध्यक्ष ,पुणे शहर), कमलाकर शेटे (उपाध्यक्ष, पुणे शहर), संगीता माने (संघटक).

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स