Yuva Sena Dominance on Shivsena Aspirants Interviews | Sarkarnama

शिवसेनेच्या मुलाखतींवर 'युवासेने'ची छाप

मिलिंद तांबे
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आजपासून मुलाखतींच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून 20 सप्टेंबर पर्यंत या मुलाखती सुरू राहणार आहेत. महत्वाचं म्हणजे मुलाखतींसाठी नेमलेल्या समितीवर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भरणा अधिक असल्याने त्यांची छाप या मुलाखतींच्या कार्यक्रमावर अधिक आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आजपासून मुलाखतींच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून 20 सप्टेंबर पर्यंत या मुलाखती सुरू राहणार आहेत. महत्वाचं म्हणजे मुलाखतींसाठी नेमलेल्या समितीवर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भरणा अधिक असल्याने त्यांची छाप या मुलाखतींच्या कार्यक्रमावर अधिक आहे.

पश्चिम महाराष्ट्र (10 सप्टेंबर) विदर्भ (13), मराठवाडा (15), उत्तर महाराष्ट्र (17), आणि कोकण (19) या विभागातील मुलाखती होणार आहेत. मुलाखतकारांमध्ये शिवसेनेचे नेते विनायक राऊत, राहुल शेवाळे, मनीषा कायंदे, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावांचा उल्लेख असला तरी युवासेनेचे सरचिटणीस वरून सरदेसाई, श्रीकांत शिंदे, अमोल कीर्तिकर हे अधिक सक्रिय आहेत. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या युवासेनेचे महत्व वाढल्याचं बोललं जातं आहे.

शिवसेना भवनमध्ये इच्छुकांच्या मुलाखतींना आजपासून सुरुवात झाली असून पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांनी आज गर्दी केली. शिवसेनेच्या नेत्यांपेक्षा युवासेनेचे पदाधिकाऱ्यांची रेलचेल अधिक दिसत होती. पक्ष प्रमुखांच्या आदेशाने निर्णय घेणाऱ्या शिवसेनेत पहिल्यांदाच पक्षीय लोकशाही तत्वाप्रमाणे मुलाखती घेण्यात येत असून लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुक प्रक्रियेत युवासेना अग्रेसर असल्याचं दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख